Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत बिनविरोधाची योजना फिस्कटली!
    • अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!
    • दिल्लीत पुन्हा इमारत कोसळली, २ जणांचा मृत्यू
    • गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!
    • लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ
    • जिल्हा बँकेवर गिरीश महाजन यांची निर्विवाद बाजी!
    • रुपाली चाकणकरांची थेट सेन्सॉर बोर्डाला धमकी
    • वायर कट करताना विजेचा धक्का लागून माय-लेकाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»हवामान»बापरे..! चक्क लोणार सरोवरात आढळले मासे!
    हवामान

    बापरे..! चक्क लोणार सरोवरात आढळले मासे!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 7, 2025No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    खाऱ्या व अल्कधर्मी पाण्यामुळे जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लोणार सरोवरात प्रथमच मासे आढळल्याने खळबळ उडाली आहे. जगातील एकमेव अल्कधर्मी सरोवर म्हणून ओळख असलेल्या लोणारच्या जैवविविधतेस यामुळे धोका निर्माण झाला आहे. शहरातील सांडपाणी आणि अतिवृष्टीमुळे सरोवराचे पाणी डायल्यूट होऊन पीएच पातळी कमी झाली आहे. सरोवराचे मूळ अस्तित्व धोक्यात असून, यामुळे पर्यावरण आणि मानवी जीवनावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी तज्ञांना चिंता आहे.

    जागतिक स्तरावरील खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणून ओळख असलेल्य लोणार येथील सरोवरात चक्क मासे आढळल्याने आता खळबळ उडाली आहे. सरोवरातील जैवविविधता धोक्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सरोवराला अनेक अभ्यासक , संशोधक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र आता मासे आढळल्याने जैवविविधता धोक्यात आले आहे . यावर्षी कधी नव्हे सरोवराचे पाणी पातळी सुद्धा वाढली आहे.

    लोणार सरोवरातील पाणी हे अत्यंत अल्कधर्मी असल्याने यातच कधीही इतिहासात सजीव सृष्टी आढळल्याची नोंद नाही, ते जगातील असे एकमेव सरोवर आहे. सरोवरातील अल्कधर्मी पाणी असल्यामुळे यात कुठलेही मासे किंवा जीव जंतू जगू शकत नाही. लोणार सरोवर उल्कापातामुळे तयार झाले होते आणि त्याचे पाणी खारट आणि क्षारीय आहे. पाण्याचा रंग बदलल्याने आणि खारटपणामुळे त्यात जीवसृष्टी दिसत नाही.

    मात्र, आता लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने यात सजीव सृष्टी निर्माण होताना दिसत आहे . या सरोवरच चक्क मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. अचानक मासे दिसल्याने सरोवराचे अस्तित्व धोक्यात येण्याची चिंता निर्माण झाली आहे.

    यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी झाली. लोणार शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता तोही धुळखात पडून आहे. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळलं जात असल्याने सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली.

    त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल . जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे. त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल . जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अमित शाहांनी अजितदादाचं जगणं मुश्किल केलं होतं!

    November 17, 2026

    गुलाबराव पाटील यांची जिल्हा बँकेत एन्ट्री!

    November 17, 2026

    लवकरच १४५ किमी प्रतितास वेगाने धडकणार चक्रीवादळ

    November 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif