Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»राजकारण»आधी खासदार फुटले आता बीएमसीही ठाकरेंच्या हातून जाणार!
    राजकारण

    आधी खासदार फुटले आता बीएमसीही ठाकरेंच्या हातून जाणार!

    मुंबईतील नगरसेवकांची संख्या कमी : आणखी एक मोठा धक्का
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 18, 2026No Comments295 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    एकीकडे ऑपरेशन टायगर अंतर्गत शिवसेना ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले आहेत. तर दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिकेत शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची कारवाईची घोषणा करण्यात येणार आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेची प्रत महापालिकेकडे दाखल झाली आहे. दीपक सावंत भांडूपमधील प्रभाग क्रमांक 111 मधून निवडणून आले होते.

    दीपक सावंत यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले होते. जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर आता दीपक सावंत यांच्यावर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची नगरसेवकांची संख्या 65 वरुन 64 होणार आहे. कुणबी आरक्षित जागेवरून निवडून आले होते. मात्र जात पडताळणी समितीने कुणबी दावा फेटाळला. त्यामुळे आता भांडुपमधील जागा रिक्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

    मुंबई महापालिका सभागृहात जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांच्या अपात्रतेचा निर्णय मंजूर झाला, तर त्याचा थेट परिणाम पालिकेतील विविध समित्यांच्या संख्याबळावर होण्याची शक्यता आहे. दीपक सावंत यांच्या अपात्रतेनंतर ठाकरे गटाची सभागृहातील संख्या 65 वरून 64 होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती, प्रभाग समिती तसेच इतर महत्त्वाच्या समित्यांमध्ये ठाकरे गटाला मिळालेल्या प्रतिनिधित्वाच्या समीकरणात बदल होऊ शकतो.

    समित्यांमध्ये पक्षांच्या संख्याबळाच्या आधारावर सदस्यसंख्या ठरवली जाते. त्यामुळे एका नगरसेवकाची संख्या कमी झाल्यास ठाकरे गटाच्या वाट्याला असलेल्या काही जागांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भांडुपमधील जागा रिक्त झाल्यानंतर आगामी काळात या जागेवर पोटनिवडणूक होण्याची शक्यता असून, तोपर्यंत पालिकेतील राजकीय गणित बदललेले पाहायला मिळू शकते.

    देशातील सर्वात श्रीमंत महापालिका आणि तब्बल 25 वर्षे ठाकरेंची एकहाती सत्ता असलेल्या मुंबई महानगरपालिकेत भाजप युतीनं ठाकरेंची सत्ता उलथवून लावली. 89 जागा मिळवत मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्यात. शिंदेंच्या शिवसेनेला 29, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी अजित पवार गटाला 3, राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1, समाजवादी पार्टीला 2 जागा जिंकल्या होत्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif