Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»अगोदर आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करून घाण काढा
    महाराष्ट्र

    अगोदर आपल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करून घाण काढा

    तुकाराम मुंढे यांना आमदाराने दाखवला आरसा : सरकारवरही निशाणा
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 28, 2026No Comments639 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचा कारभार हाती घेतल्यापासून धडाधड कारवाया सुरू आहेत. भेसळ आणि भेसळखोरांविरोधात त्यांनी कायद्याचा बडगा उगारल्याने जनतेकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावर सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्यांशी खेळणाऱ्यांविरोधात ते धाडसी कारवाई करत असल्याने अनेकांनी त्यांची आता बदली करू नका अशी सरकारकडे मागणी केली आहे. त्याचवेळी माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी तुकाराम मुंढे यांना आरसा दाखवला आहे. त्यांच्या आरोपांमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

    तुकाराम मुंडेनी बाहेर जाऊन धाडी मारण्यापेक्षा अगोदर त्यांनी त्यांच्या खात्यातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना बडतर्फ करून घाण काढून अगोदर विभाग स्वच्छ करावा. छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेले प्रशांत कुचेकर, इलागे हे औषध प्रशासनातले दोन अधिकारी गुटख्याचे रॅकेट चालवतात. कुचेकर यांच्यावर सोलापूर मध्ये असताना गुटखा तस्करीचा गुन्हा दाखल असून इलागे यांच्या स्वत:च्या गाडीत तर ३ कोटी ४२ लाखाची कॅश सापडली असा गंभीर आरोप माढ्याचे आमदार अभिजीत पाटील यांनी केला. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली असून आता तुकाराम मुंढे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.

    प्रशांत कुचेकर आणि इलागे या दोघाचा विषय सभागृहात मांडलाय तर दोघा अधिकार्‍यावर केवळ शिस्तभंगाची कारवाई केली. सरकारचा मला खेद वाटतो.. सभागृहात या दोघांविषयी सगळी माहिती देऊन फक्त शिस्तभंगाची कारवाई केली. थेट या दोघांना बडतर्फ करण्याची गरज होती अशी अपेक्षा आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली. अशी कारवाई केली तरच औषध प्रशासन स्वच्छ होईल, असे ते म्हणाले.

    अशोक गुप्ता हा महाराष्ट्रात गुटख्याचे रॅकेट( पोहच करणारा) चालवणारा व्यक्ति असून रॅकेटची साखळी राबवत आहे. पथक धाडी टाकण्याला जाण्या अगोदर देखील या विभागातील अधीकारी गुटखा तस्करांना फोन करुन माहिती देत आहेत .कोट्यावधीचा माल लाख रुपयाचा दाखवला जातो. गुटखा रॅकेट कसे चालते याची सगळी माहिती तुकाराम मुंडेना भेटून दिली आहे. १०० रुपयाला १० मिळणाऱ्या गुटख्याच्या पुड्या आता मुंडे यांच्या धास्ती मुळे आता १०० रुपयात ३ मिळत आहेत, असा दावा पाटील यांनी केला. कृषीबातम्या

    ऑपरेशन तुतारीवरही आमदार अभिजीत पाटील यांनी मत व्यक्त केले. मी मविआ बैठकीत होतो उद्धव ठाकरेच्या स्नेह भोजन घेऊन आलो मी बैठकीला दांडी मारल्याच्या चुकीच्या बातम्या समोर आल्या. शरद पवारांनी सांगितले आहे.त्या प्रमाणे एक ही जण पक्षातून जाणार नाही, असा दावा त्यांनी व्यक्त केला. तर विश्वास नागरे पाटील यांनी संघाशीसंबंधीत कार्यक्रमाला हजेरी लावल्याप्रकरणी त्यांनी टीका केली. प्रशासनातील अधिकाऱ्याचा कोणताच पक्ष नसतो. त्यांनी अधिकारी होताना घेतलेल्या शपथेचं स्मरण ठेऊन निःपक्षपाती भूमिका घेणे आवश्यक होती. कुणा एकाची बाजू घेणे चुकीचे असल्याचे माढ्याचे आमदार अभिजीत पाटील म्हणाले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif