Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    गुन्हे वार्ता

    गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!

    आरोपींसह ६ जणांना जेरबंद : रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर कारवाई
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 16, 2026No Comments228 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच आणि भक्तीमय वातावरण असतानाच किरकोळ वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना पुण्यातील कोंढव्यात घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यानंतर पोलिसांनी तडक कारवाई केली.

    पुण्यात सध्या भक्तीमय वातावरण आहे. गणेशोत्सवाची धूम आहे. या सण उत्सवाच्या वातावरणात विविध मंडळाचे कार्यक्रम सुरू आहे. पण किरकोळ कारणावरून कोंढव्यात काही दिवसांपूर्वी गोळीबाराची घटना घडली होती. यामुळे या भागात दहशत निर्माण झाली होती. रात्री झालेल्या घटनेत जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या भागात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न टोळक्याने केला होता. पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अशा गुन्हेगारी प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. तर प्रकरणात पोलिसांनी रात्रीतूनच सूत्र हलवून धडक कारवाई केली आहे.

    कोंढवा परिसरात गणपती मंडपाजवळ तरुणावर पिस्टलमधून गोळीबार करण्यात आला होता. मित्रासोबत झालेल्या वादातून तरुणावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यात आला होता. ६ सप्टेंबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली होती. दादू भालेराव आणि त्याच्या ८ ते १० साथीदारांनी आरडाओरड करत दहशत निर्माण केल्याचा आरोप होता. दादू भालेराव याने पिस्टलमधून तरुणाच्या दिशेने गोळी झाडल्याचा आरोप आहे. गोळी तरुणाच्या डाव्या पायाच्या पोटरीतून आरपार गेल्याने गंभीर दुखापत झाली आहे.

    कोंढवा पोलीस ठाण्यात जीवघेणा हल्ला आणि गोळीबाराचा गुन्हा दाखल केला आहे. तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपींना अटक केली. पोलिसांनी कारवाई करत ६ सराईत आरोपींना अटक केली. जितेंद्र उर्फ दादू जालिंदर भालेराव, लक्ष्मण उर्फ सोनू उर्फ जांभ्या गजरमल, प्रज्वल उर्फ पज्या बापू कदम यांचा आरोपींमध्ये समावेश आहे. दिनेश रामदास घाडगे, कार्तिक महादेव पांडागळे आणि विजय रामदास चोंधे यांनाही अटक करण्यात आली आहे.

    अटक केलेल्या आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे. आरोपींना पोलीस कोठडी रिमांड मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या तरुणांकडे बेकायदेशीर पिस्टल आले कुठून, हा हल्ला का करण्यात आला. ज्या तरुणावर हल्ला करण्यात आला, त्याची पार्श्वभूमी याचा सखोल तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. तर अशा गुंडांवर सणासुदीत वॉच ठेवण्याची मागणीही करण्यात आली आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!

    October 15, 2026

    मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!

    October 15, 2026

    पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif