petro-canada gift card amazon gift card generator 2012 online stew leonard's wine gift baskets barilla coupons canada 2015 american doll store nyc coupons gift world zegar projekcyjny
Thursday, December 1, 2022

पोलिसांनीच पंतप्रधानांचे घर पेटवले; श्रीलंकेतील आंदोलकांचा आरोप

- Advertisement -

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

श्रीलंकेतील आर्थिक व राजकीय संकटाच्या (Sri Lanka’s economic and political crisis) पार्श्वभूमीवर गुंतवणूक प्रोत्साहन मंत्री धम्मिका परेरा यांनी रविवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. धम्मिका गत 2 महिन्यांत मंत्रिपदाचा राजीनामा देणारे लंकेचे चौथे मंत्री आहेत. दुसरीकडे, लष्करप्रमुख शैवेंद्र सिल्व्हा यांनी देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जनतेला संरक्षण दल व पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

- Advertisement -

​दुसरीकडे, आंदोलकांनी आंदोलनाच्या 116 दिवसांनंतर राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (President Gotbaya Rajapaksa) यांच्या निवासस्थानावर कब्जा केला आहे. राष्ट्रपती भवनावर कब्जा केल्यानंतर राजधानी कोलंबोतून फरार झालेल्या गोटबायांनी 13 जुलै रोजी राजीनामा देण्याची घोषणा केली आहे. तत्पूर्वी, त्यांचे बंधू महिंदा राजपक्षे यांनीही मे महिन्यात पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला होता. लंकेतील राजपक्षे कुटुंबाविरोधात गत 15 मार्चपासून निदर्शने सुरू झाली आहेत.

- Advertisement -

आंदोलकांनी शनिवारी रात्री पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांचे घर पेटवले. त्यानंतर विक्रमसिंघे यांनी तातडीने आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या