allure perfume gift set bencraft hatters coupon 6 mo old baby gifts red themed gift baskets
Friday, December 2, 2022

दुर्गापूजा मंडपाला भीषण आग; 2 बालकांसह चौघांचा मृत्यू, 64 भाविक होरपळले

- Advertisement -

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) भदोही नजीक (Bhadohi) नर्थुआ येथे हृदयद्रावक घटना घडली आहे. दुर्गा पूजा (Durga Puja) मंडपात रविवारी रात्री 8 च्या सुमारास आरती सुरू असताना भीषण आग (fire) लागली. या दुर्घटनेत दोन बालकांसह चौघांचा होरपळून मृत्यू झाला तर 64 हून अधिक जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

- Advertisement -

- Advertisement -

औरई-भदोही मार्गावरील नर्थुआ येथे असलेल्या एकता क्लबचा मंडप लोकप्रिय आहे. त्यामुळे नवरात्रीच्या (Navratri) काळात येथे गर्दी होत असते. रविवारी रात्री आठच्या सुमारास मंडपात आरती सुरू होती आणि त्यात दीडशेहून अधिक भाविक सहभागी झाले होते. मंडपात डिजिटल शोही सुरू होता. याचदरम्यान मंडपाला अचानक आग लागली. आगीपासून जीव वाचविण्यासाठी भाविकांची पळापळ सुरू झाली. काही वेळातच संपूर्ण मंडपाने पेट घेतला. घटनास्थळी आरडाओरडा झाला.

दरम्यान दुर्घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांबरोबरच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जिल्हाधिकारी गौरांग राठी आणि पोलीस अधीक्षक डॉ. अनिल कुमार घटनास्थळी बचावकार्यावर लक्ष ठेवून होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अग्निशमन दलाने तासाभरात आग आटोक्यात आणली. या आगीत अंकुश सोनी (वय 12) याच्यासह चार जणांचा मृत्यू झाला असून 64 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

वाराणसीच्या विभागीय रुग्णालयात उपचारादरम्यान एका महिलेचा मृत्यू झाला. मात्र, प्रशासनाने 12 वर्षांच्या मुलासह केवळ दोघांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या जास्त असून त्यांना कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथून 37 जणांना वाराणसीला रेफर करण्यात आले. यापैकी 20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून दर्घटनेची माहिती घेतली आणि जखमींवर चांगल्या उपचाराची व्यवस्था करण्यास सांगितले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या