लोकशाही न्यूज नेटवर्क
येळकोट येळकोट जयमल्हार अशा जयघोषात जेजुरीत खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असतानाच अचानक आगीचा भडका उडाला आणि एकच गोधळ झाला. जेजुरी नगरपरिषदेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी थेट जेजुरी गाठत पायरीजवळ भंडाऱ्यांची उधळण सुरु केली. मात्र त्याचं वेळी आगीचा भडका उडाला आणि त्यात दोन नवनिर्वाचित नगरसेवकांसह तब्बल 16 जण भाजले गेले.
हा भडका उडण्यासाठी भंडाऱ्यातील भेसळ कारणीभूत ठरल्याचं सांगितलं जातय. आठ महिन्यापूर्वी मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी भंडाऱ्यात होत असलेल्या भेसळीमुळे भावीकांचे आरोग्य धोक्यात येत असल्याचा आरोप केला होता. त्याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदनही दिलं होतं. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
जेजुरीचा खंडेराया महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. मोठ्या भक्ती भावना महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने भाविक जेजुरी येत असतात. कित्येक गोण्या भरून भंडारा इथे येत असतो. मात्र हा भंडारा नक्की कोठून येतो हे निश्चित नाही. व्यापारी ही यावर बोलायला तयार नाहीत. ही दुर्घटना जर भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल तर त्यावर तातडीनं कारवाई व्हायला हवी.

