वाडिया रुग्णालयाला आग…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मुंबईत परळ येथील वाडिया (लहान मुलांचे) रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. ऑपरेशन थियेटरमध्ये शओर्त सर्किटमुळे आग भडकली असल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. त्याच बरोबर ऑपरेशन थियेटरमधील व जवळील सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले माहिये. तसेच आगीमध्ये किती नुकसान झाले आहे याचे देखील स्पष्ट वृत्त नाही. मात्र या घटने नंतर रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवरून त्याबद्दल आढावा घेतला. आणि घटनेची चौकशी केली. तातडीने आग विझवून प्रशासकीय मदतीच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.