लोकशाही संपादकीय लेख

जळगावच्या पोलीस मुख्यालयातील स्टेशनरी विभागात अचानक आग लागून महत्त्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. ही आग कशी लागली? याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असा प्राथमिक अंदाज आहे. आगीने चांगलेच रौद्ररूप धारण केले होते. तातडीने मनपाला फोन करून आगीचे बंब पाचारण करण्यात आले आणि तातडीने शर्तीच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली गेली. या आगीत कसलीही जीवित हानी झाली नाही हे विशेष होय. परंतु आगीच्या भक्षस्थानी महत्त्वाचे दस्तऐवज जळून खाक झाले असे सांगण्यात येते. आता ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली अथवा कशामुळे लागली? याचा पोलीस शोध घेत आहेत. परंतु एवढ्या बंदिस्त खोलीमध्ये आग लागलीच कशी? हा एक शोधाचा भाग आहे. पोलीस मुख्यालयात असलेल्या स्टेशनरी विभागातील महत्त्वाची कागदपत्रे जळाल्याने या प्रकरणाला वेगळाच वास येतो आहे. त्या कागदपत्रात काय काय महत्त्वाची कागदपत्रे होती? हे नंतर कळलेलच; पण आतापर्यंत पोलीस मुख्यालयात असा आगीचा प्रकार झाला नाही हे विशेष होय. पाहूया काय सिद्ध होते ते..!


