Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»विमानतळावर जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर दंड
    महाराष्ट्र

    विमानतळावर जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर दंड

    वाढती वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठा निर्णय
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 15, 2026No Comments128 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    विमानतळावर वाढत्या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी एका जिल्ह्यात विमानतळ प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा घेण्यासाठी येणाऱ्या खासगी चारचाकी वाहनांमुळे टर्मिनल परिसरात होणारी गर्दी आणि वाहतूक अडथळे लक्षात घेऊन आता १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबणाऱ्या वाहनांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. हा निर्णय पुण्यात घेण्यात आला आहे. पुणे विमानतळ प्रशासनाने यासंदर्भातील प्रस्ताव दिल्ली येथील मुख्यालयाकडे मंजुरीसाठी पाठवला होता. या प्रस्तावाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

    सध्या पुणे विमानतळावर दररोज हजारो प्रवाशांची ये-जा होत असते. प्रवाशांना सोडण्यासाठी किंवा त्यांना घेण्यासाठी अनेक नागरिक खासगी वाहनांमधून विमानतळावर येतात. मात्र, अनेकदा नातेवाईकांची वाट बघत आपली वाहने टर्मिनलसमोर बराच वेळ उभी ठेवतात. काहीवेळा हे वाट पाहणं अर्धा तास ते एक तासांपर्यंतही वाढते.

    परिणामी, टर्मिनल परिसरात वाहनांच्या रांगा लागतात आणि वाहतुक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे विमान पकडण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांना वेळेत टर्मिनलपर्यंत पोहोचण्यात अडचणी निर्माण होतात. तसेच विमानतळ परिसरातील इतर वाहनांच्या हालचालींवरही याचा परिणाम होतो. ही समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

    विमानतळ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाहन उभे ठेवणाऱ्यांवर ५०० रुपयांचा दंड आकारण्यात येईल. यासाठी वेळेची नोंद ठेवणारी यंत्रणा वापरण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना विनाकारण थांबणे टाळावे लागेल. या निर्णयामुळे विमानतळ परिसरातील अनावश्यक गर्दी कमी होईल, वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी होईल आणि प्रवाशांना वेळेत विमानतळावर पोहोचणे सुलभ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पुणे विमानतळ प्रशासनाचा हा निर्णय प्रवाशांच्या सोयीसाठी आणि वाहतूक शिस्त राखण्यासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif