बहिण भावाच्या नात्याला काळीमा : अखेर गुन्हा उलगडला

भाऊ अन वाहिनीनेच तुकडे करून नदीत फेकले

0

 

पुणे

पुण्यात गुन्हेगारी प्रचंड वाढली आहे. पोलिसांच्या अनेक उपाययोजनेनंतरही गुन्हेगारी कमी होतांना दिसून येत नाहीये. किरकोळ कारणांवरुन हल्ले होण्याचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. अश्यात काही दिवसांपूर्वी पुण्यातील नदीपात्रात मृतदेहाचे तुकडे मिळाले होते. त्या खून प्रकरणाचा उलगडा झाला आहे. त्या महिलेच्या भाऊ आणि वहिनीने तिची हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करुन नदीला पूर आला असताना त्यात मृतदेह फेकून दिला. एका खोलीच्या मालकी वादातूनही ही हत्या झाली.

 

पुण्यातील नदी पात्रात 26 ऑगस्ट रोजी मृतदेह सापडला होता. पुणे शहरातील चंदननगर पोलीस ठाणाच्या हद्दीत मुळा मुठा नदीमध्ये शीर, हात-पाय नसलेला मृतदेह आढळला होता. त्या सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा झाला आहे. तो मृतदेह सकीना खान नावाच्या महिलेचा आहे. झोपडपट्टीतील एका खोलीच्या मालकीच्या वादातून तिचा सख्खा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांनी तिची हत्या केली.

 

पुण्यातील पाटील इस्टेट भागतील एका खोलीवरुन भाऊ अन् बहिणीत वाद सुरु होता. या मालकीच्या वादातून ही हत्या झाली. ही खोली सकीनाच्या नावावर होती. सकीनाचा भाऊ अशपाक आणि वहिनी हमीदा तिला घरातून निघून जाण्यास सांगत होते. मात्र ती जात नसल्याने तिची हत्या करण्याचा डाव त्यांनी रचला. 26 ऑगस्ट रोजी पुण्यात पाऊस होता. नदीला पूर आले होते. मग घरातून धारदार शस्त्राने त्यांनी सकीनाची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह संगमवाडी येथील नदीपात्रात फेकून दिला.

 

सकीना गावाला गेल्याची खोटी माहिती अशपाक याने शेजाऱ्यांना दिली. मात्र शेजाऱ्यांना संशय आल्यावर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अशपाकची चौकशी केली. त्यातून या हत्येचा उलगडा झाला. पोलीसांनी सकिनाचा खून प्रकरणात अशपाक खान आणि वहिनी हमीदा यांना अटक केलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.