Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»राजकारण»अखेर थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ
    राजकारण

    अखेर थलपती विजय यांनी घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ

    तामिळनाडूच्या राजकारणात नव्या इतिहासाची नोंद : वडील भाऊक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 10, 2026No Comments380 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तमिळनाडूच्या राजकारणात आज इतिहास नोंदवला गेला. गेल्या पाच दिवसापासून सुरू असलेल्या सत्ता स्थापनेचा गोंधळ शनिवारी मिटला. टीव्हीके पक्षाचे संस्थापक विजय थलपती यांच्या पक्षाचे सरकार स्थापन केलं. आज रविवारी सकाळी सीएम पदाची शपथ घेतली. १० मे, २०२६ हा दिवसाची इतिहासात नोंद झाली. चित्रपट अभिनेते-राजकारणी थलपथी विजय यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये हजारो समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी शपथ घेतली. पण या भव्य सोहळ्यादरम्यान एक भावनिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला.

    विजय मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असताना प्रेक्षक गॅलरीत बसलेले त्यांचे वडील, एस. ए. चंद्रशेखर टाळ्या वाजवत असताना रडू लागले. त्यांच्या डोळ्यांत आनंदअश्रू आले. आपल्या मुलाचे यश पाहून वडिलांच्या डोळे पाणावले होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये टीव्हीके प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सोहळ्यात अनेक प्रमुख राजकीय व्यक्ती उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी हेही मंचावर होते. तर भाजप आणि इतर पक्षांचे नेतेही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

    विजयाची ही शपथ तामिळनाडूच्या राजकारणातील एका नव्या पर्वाची सुरुवात मानली जातेय. अभिनेते विजय यांनी सीएम पदाची शपथ घेणार असल्याने समर्थक प्रचंड उत्साही होते. शपथ घेतल्यानंतर संपूर्ण स्टेडियममध्ये टाळ्यांचा कडकडाट ऐकायला मिळाला.

    विजयच्या वडिलांना आनंदाश्रू अनावर

    दरम्यान शपथविधी सोहळ्यातील सर्वात भावनिक क्षण देखील पाहायला मिळाला. हा क्षण होताच, विजय यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक एस. ए. चंद्रशेखर टाळ्या वाजताना रडू लागले होते. आपल्या मुलाला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना पाहून स्वतःला आवरू शकले नाहीत. मुलगा सीएम बनल्याचे पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. सुरुवातीला ते अभिमानाने टाळ्या वाजवत असल्याचे दिसत होते, पण काही क्षणांतच त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. हाच क्षण कॅमेऱ्याने नेमका टिपला. जवळच बसलेल्या विजयच्या आई, शोभा चंद्रशेखर यादेखील अत्यंत भावुक झाल्याचं दिसल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!

    September 11, 2026

    कोणाच्याही ताटातील कोणालाही देणार नाही!

    September 10, 2026

    यावल नगरपरिषदेची अतिक्रमण कारवाई नियमानुसारच!

    September 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif