Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    गुन्हे वार्ता

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    आयएमएचा बंद स्थागीत : हायकोर्टाच्या इशाऱ्यानंतर शरणागती
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 19, 2026Updated:July 19, 2026No Comments355 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांवर झालेल्या कथित हल्ल्याप्रकरणी मोठी घडामोड समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कडक आदेशानंतर, शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी आज अखेर विष्णुनगर पोलीस ठाण्यात शरणागती पत्करली आहे.

    काही दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या केडीएमसी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांवर हल्ला झाला होता. या प्रकरणात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळालेला जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच रद्द केला. इतकेच नव्हे तर न्यायालयाने म्हात्रे यांना आज (१९ जुलै) सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोलिसांसमोर शरण येण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. जर न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही, तर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल, असा थेट इशाराही हायकोर्टाने दिला होता. न्यायालयाच्या या इशाऱ्यानंतर रमेश म्हात्रे विष्णुनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांना पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी कल्याण न्यायालयात रवाना केले असून, न्यायालय आता काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    डॉक्टरांवरील या कथित हल्ल्यानंतर राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला होता. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) या घटनेचा निषेध करत २० जुलै रोजी राज्यव्यापी वैद्यकीय सेवा बंदची हाक दिली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनाचा आदर राखत आयएमए (आयएमए) आणि राज्यातील इतर सर्व वैद्यकीय संघटनांनी हा बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

    १८ जुलै रोजी मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत विशेष सुनावणी घेतली होती. न्यायालयाने आरोपीचा जामीन स्थगित करत त्याला आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले होते, तसेच डॉक्टरांना आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले होते. न्यायालयाच्या या सकारात्मक भूमिकेनंतर आयएमएचे राज्य पदाधिकारी, आयुर्वेद, होमिओपॅथी, दंतवैद्य संघटना आणि शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चर्चा करून बंद मागे घेण्याचा निर्णय प्रसिद्ध केला. न्यायालयाने स्वतःहून घेतलेली दखल ही डॉक्टरांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असून, सरकारने या आदेशाची पळवाट न काढता कठोर अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षा आयएमएने व्यक्त केली आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!

    August 10, 2026

    फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली

    August 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif