Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    • शरद पवार यांना ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
    • गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या
    • महायुतीचे 12 संचालक गोवा, सूरत प्रवास करून उदयपूरला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अखेर ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार
    गुन्हे वार्ता

    अखेर ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार

    सरकारचे आदेश : सर्वात मोठा झटका
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveNovember 4, 2026No Comments426 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सर्वात मोठा झटका बसला आहे. लाचखोरीप्रकरणी ज्ञानेश कुमार यांची चौकशी होणार आहे. केरळचे गृहमंत्री रमेश चेन्निथला यांनी ज्ञानेश कुमार यांच्या लाच प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दशकापूर्वीचं हे प्रकरण आहे. केरळ स्टेट ट्रान्सपोर्ट प्रोजेक्टशी संबंधित आहे. एक ठेकदार साजन याने त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव असलेल्या ज्ञानेश कुमार यांच्यावर दोन कोटी रुपये लाच मागितल्याचा आरोप केला होता. या तक्रारीच्या आधारे व्हिडिलन्स अँड अँटी करप्शन ब्युरोला या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

    ज्ञानेश कुमार हे केरळमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव होते. तेव्हाचं हे प्रकरण आहे. तक्रारदार साजन हा कोल्लम जिल्ह्यातील चांदयामंगलम येथील रहिवाशी आहे. त्याने व्हिजिलन्स डिपार्टमेंटच्या संचालकांकडे तक्रार केली होती. राज्यातील रस्ते बांधल्यानंतरही कंपनीचे पैसे रखडवण्यात आले होते. अभियंत्यांनी 17 कोटींच्या बिलाला मंजुरी दिली होती. पण त्यानंतरही आमचा चेक देण्यात आला नव्हता, असं तक्रारीत म्हटलं आहे.

    साजन याने त्याच्या तक्रारीत मलेशियाची कंपनी PATI-BEL आणि त्याच्या ठेकेदारांचा उल्लेख केला आहे. कंपनीचे प्रोजेक्ट इंजीनिअर मलेशियाई नागरिक ली सी बीन यांनीच मला ज्ञानेक कुमार हे कथितपणे दोन कोटी रुपयंची लाच मागत असल्याचं सांगितलं होतं, असं म्हटलं आहे. दोन कोटी दिल्याशिवाय चेक जारी केला जाणार नाही, असं ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं होतं. लाच देऊन चेक मिळवण्यास कंपनीच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली नव्हती. काही रक्कम देऊन प्रकरण मिटवण्यास कंपनीच्या काही लोकांनी सांगितल होतं. पण कंपनी त्यासाठी तयार नव्हती, असं साजन यांनी तक्रारीत म्हटलं आहे.

    पेमेंटला उशिर झाल्याने PATI-BEL कंपनीच्या ठेकदार आणि मजुरांनी आर्थिक समस्यांना सामोरे जावं लागलं होतं. ठेकेदार आणि मजदुरांची थकीत रक्कम देण्यासाठी ली सी बीन यांनी बंगळुरू येथील कंपनीच्या दुसऱ्या प्रकल्पातील रकमेचा वापर केल्याचा दावाही त्यांनी केला आहे. देय रक्कम थकवली गेली आणि लाच मागितल्या गेल्यामुळे ली सी बीन यांच्यावर दबाव वाढत होता, असंही या तक्रारीत म्हटलं आहे. त्यानंतर 2006 मध्ये साजन यांनी आयुष्य संपवलं होतं. त्यामुळे या घटनाक्रमाला साजन यांच्या टोकाच्या निर्णयाशी जोडून पाहिलं जात आहे.

    साजन यांनी टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. त्यात त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेचा उल्लेख केला होता. या लाचखोरी प्रकरणाची 2006 मध्ये चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी व्हिजिलन्सने ज्यांना लाचखोरी प्रकरणाची थेट माहिती आहे, त्या लोकांची चौकशी केली नव्हती, असं या चिठ्ठीत म्हटलं होतं.

    दरम्यान, आता या प्रकरणावर व्हिजिलन्सची चौकशी होणार आहे. देशभरात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण असतानाच या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र, ही तक्रार आणि एसआयआर हे दोन्ही प्रकरणं वेगवेगळी आहेत. मात्र, ज्ञानेश कुमार यांच्यावर झालेल्या लाचखोरीची अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाची अजून चौकशी व्हायची बाकी आहे. ज्ञानेश कुमार यांची या आरोपांवर सध्या कोणताही प्रतिक्रिया आलेली नाही.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    गणेशोत्सवातील वादातून तरुणाची निर्घृण हत्या

    November 7, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026

    E-20 पेट्रोल 420 इंधन : थेट पुराव्यांसह मोठा आरोप

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif