
लोहारा ता. पाचोरा
ग्रामपंचायत कंपाऊंडच्या लगतच शहादल शहावली कमान व दहा पाऊल पुढे चालून अशा दोन ठिकाणी पाणी वितरण करणारी पाईपलाईन जवळपास एक महिन्यापासून लिकेज असताना प्रशासक राजचे समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिनांक ५ मे मंगळवार रोजी दैनिक लोकशाहीने लोहारा ग्रामपंचायत लगतच लिकेज या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रकाशित केले होते.

दरम्यान याची दखल लोहारा प्रशासकराज दीपक शिंदे, ग्रामपंचायत अधिकारी गजानन काळे यांनी घेऊन कर्मचाऱ्यांना आदेश दिले. यामुळे सायंकाळपर्यंत दोन्ही ठिकाणचे लिकेज काढण्यात आले. वृत्तामुळे ग्रामपंचायत कर्मचारी अर्जुन पाटील ,नाना सरोदे, सुनील बाविस्कर यांना ‘दिव्याखालीच अंधार’ अशा म्हणीचा प्रत्यय ग्रामस्थांना अनुभवला येत होता.तात्काळ वृत्तामुळे कार्यवाही झाल्याने वाचक व ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. यामुळे ग्रामस्थांना आरोग्य विषयी सामना करावा लागणार नाही.

