Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»‘त्या‌’ खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाध्यक्षांना अंतिम नोटीस
    जळगाव

    ‘त्या‌’ खुल्या भूखंड प्रकरणी संस्थाध्यक्षांना अंतिम नोटीस

    महानगरपालिकेने केला जागेचा पंचनामा : ॲड. पाटील यांच्या तक्रारीची दखल
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 6, 2026Updated:August 6, 2026No Comments202 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    शहरातील 103 निमखेडी शिवारातील वादग्रस्त खुल्या भूखंडाबाबत सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष पाटील यांनी जळगाव महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. त्या तक्रारीची दखल घेत महानगरपालिकेच्या नगररचना विभागामार्फत संबंधित जागेचा पंचनामा करण्यात आला होता.

    अतिरिक्त आयुक्त सौ. बाविस्कर यांच्या आदेशानुसार नगररचना विभागाचे नगररचनाकार अमोल पाटील, अभियंता अतुल पाटील, अतिक्रमण विभागाचे संजय ठाकूर व मनपा कर्मचाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी करून पंचनामा केला. यावेळी जागेवरील खोल्यांचे मोजमाप करण्यात आले. पाहणीदरम्यान काही खोल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य साठवलेले आढळले, तर काही ठिकाणी नागरिक वास्तव्यास असल्याचेही निदर्शनास आले.

    संबंधित जागेचा पंचनामा पूर्ण झाल्यानंतर अंतिम नोटीस देण्यासाठी नगररचना विभागाने जवळपास एक महिन्याचा कालावधी घेतल्याने परिसरातील नागरिकांसह तक्रारदार ॲड. पियुष पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. युवा विकास फाउंडेशन संचलित सीताबाई गणपत भंगाळे शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष यांना मनपा मालकीच्या जागेवर नियमबाह्य उभारण्यात आलेल्या बांधकामाबाबत अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे.

    या प्रकरणात यापूर्वीही दोन नोटिसा देण्यात आल्या होत्या. मात्र, संबंधित संस्थेकडून बांधकाम परवानगी किंवा इतर आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आलेली नसल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संबंधित बांधकाम अतिक्रमण असल्याचे गृहीत धरून ते का पाडण्यात येऊ नये, याबाबत 15 दिवसांत खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

    महानगरपालिकेने दिलेल्या अंतिम नोटीसमध्ये 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या कालावधीत समाधानकारक खुलासा किंवा आवश्यक कागदपत्रे सादर न झाल्यास अतिक्रमण विभागामार्फत जेसीबीच्या सहाय्याने संबंधित बांधकाम हटविण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

    मनपा प्रशासनावर नाराजी

    या संदर्भात तक्रारदार सामाजिक कार्यकर्ते ॲड. पियुष पाटील यांनी सांगितले की, संबंधित संस्थेला यापूर्वी दोन वेळा नोटिसा देण्यात आल्या होत्या. त्या वेळीही बांधकाम परवानगी, न्यायालयीन स्थगिती अथवा अन्य कायदेशीर कागदपत्रे सादर करण्यात आलेली नव्हती. असे असतानाही अंतिम कारवाई करण्यास झालेला विलंब संशयास्पद असून नगररचना विभाग संबंधितांवर मेहरबान असल्याचा संशय निर्माण होत आहे. तसेच, मनपा व संस्थेमधील करारनाम्यानुसार आणि मंजूर बांधकामाच्या अटींनुसार वाढीव अतिक्रमण आढळल्यास कोणतीही पूर्वसूचना न देता ते हटविण्याचा तसेच त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे. त्यामुळे पुन्हा अंतिम नोटीस देण्याची आवश्यकता काय होती, असा प्रश्नही ॲड. पाटील यांनी उपस्थित केला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif