Tuesday, November 29, 2022

धक्कादायक ! प्रसिद्ध निर्मात्याने पत्नीला कारने चिरडलं (व्हिडिओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ‘भूतियापा’, ‘देहाती डिस्को’ सारखे चित्रपट निर्माण करणारे निर्माता कमल किशोर मिश्रा (Kamal Kishore Mishra) यांच्यावर पत्नीला कारने चिरडल्याचा आरोप आहे. तसेच या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

पत्नीने कमलला दुसऱ्या महिलेसोबत पकडलं होतं, त्यानंतर हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कमलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये कमलची पत्नी जमिनीवर पडताना दिसत आहे. ही घटना 19 ऑक्टोबर रोजी पश्चिम अंधेरीतील एका निवासी इमारतीच्या पार्किंग परिसरात घडली. ANI या वृत्तसंस्थेने या घटनेचा एक्स्ल्युझिव्ह व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडीओमध्ये दिसत आहे की पार्किंग एरियामध्ये एक महिला कार चालकाला थांबवते. पण तो थांबत नाही आणि तिला कारसमोर धडकतो. ती महिला पडते आणि नंतर कारचा पुढचा भाग तिच्यावर आदळतो. यामध्ये एक व्यक्ती धावत येऊन महिलेला कारखालून बाहेर काढतो. या घटनेनंतर आपल्या डोक्याला जबर दुखापत झाल्याचं त्यांच्या पत्नीचं म्हणणं आहे.

पत्नीला कारने धडक दिल्याप्रकरणी चित्रपट निर्माते कमल किशोर मिश्रा यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात आएपीसी कलम 289 आणि 338 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर चित्रपट निर्माता कमल अद्याप फरार आहे. त्याचा शोध सुरु असून याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या