Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग सुरू!
    मनोरंजन

    ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ चित्रपटाचे शूटिंग सुरू!

    पहिल्याच फोटोने वेधले लक्ष : खरातच्या भूमिकेची उत्सुकता
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 22, 2026No Comments321 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अनेक महिलांचे लैंगिक शोषण करणारा नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातवर आधारित ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगला मुंबईमध्ये सुरूवात झाली आहे. या चित्रपटाच्या सेटवरून पहिला फोटो समोर आला असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. दिपाली सय्यद आणि त्यांच्यासोबत भोंदू अशोक खरातची भूमिका साकारणारा अभिनेता या फर्स्ट लूकमध्ये पाहायला मिळत आहेत.

    शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. दिपाली सय्यद यांचा फर्स्ट लूक समोर आला असून त्या हुबेहुब रुपाली चाकणकर यांच्यासारख्याच दिसत आहेत. या चित्रपटामध्ये भोंदू अशोक खरातची भूमिका बजावणाऱ्या अभिनेत्याबाबत कमालिची गोपनियता पाळण्यात आली आहे. फर्स्ट लूकमध्ये दिपाली सय्यद यांच्यासोबत भोंदू खरातची भूमिका साकारणारा अभिनेता पाठमोरा उभा राहिल्यामुळे तो नक्की कोण आहे? हे कळत नाही आहे. पण हा अभिनेता कोण आहे? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

    भोंदू अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकले. या प्रकरणामुळे राजकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासोबत अनेक नेत्यांची नावं समोर आली होती. हे प्रकरण संपूर्ण राज्यभर गाजल्यानंतर त्यावर आधारीत चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटामुळे राजकीय आणि मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली. या चित्रपटामध्ये दिपाली सय्यद या रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार असल्याचे कळाल्यानंतर त्यांना अनेक धमक्यांचे फोन आले होते.

    दिपाली सय्यद यांनी या चित्रपटामध्ये काम करू नये आणि राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू नये यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला गेला आणि त्यांना वारंवार धमक्या दिल्या गेल्या. ऐवढेच नाही तर त्यांना जीवे मारण्याची धमकी आणि राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील देण्यात आली होती. असे असताना देखील दिपाली सय्यद यांनी कितीही धमक्या आल्या तरी मी या चित्रपटात काम करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.

    भोंदू अशोक खरातवर आधारित ‘महाराष्ट्र एप्स्टिन फाइल्स’ या चित्रपटाचे दिग्दर्शक स्वरूप बी सावंत हे आहेत. त्यांनी अशोक खरातच्या प्रकरणाला ७० एमएम पडद्यावर आणण्याचे ठरवले आहे. या चित्रपटाबाबत सर्वांना प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटाद्वारे अशोक खरातचे काळेधंदे सर्वांसमोर येतील. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. यामध्ये दिसणारा कॅप्टन भोंदूबाबा कोण? अशी चर्चा सुरू झाली होती. अजूनही या चित्रपटात भोंदूबाबाच्या भूमिकेत कोण असणार? हे स्पष्ट झाले नाही.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif