धार्मिक भावना दुखावणाऱ्या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

यावल तालुक्यातील सावखेडा सिम येथे धार्मिक भावना दुखावल्या बद्दल एक अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील सावखेडा सीम येथील गावातील पाण्याच्या टाकीवर दोन हिरवे कापडाचे झेंडे लावलेले होते. त्यानंतर एक भगवा झेंडा लावण्यात आला त्या दोन हिरव्या झेंड्यांच्या व्हाट्सअपवर फोटो घेऊन त्यावर लाल रंगाने क्रॉस करून व त्याचे खाली धार्मिक तेढ निर्माण होईल असे लिहिलेले स्टेटस ठेवले व  हा फोटो गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने  स्वत:च्या मोबाईल क्रमांकावरून व्हायरल केले. त्यामुळे गावातील इतर धर्मीय बांधवांच्या धार्मीक भावना दुखावल्याची घटना समोर आली.

धार्मिक भावना दुखावणाऱ्यावर यावल पोलीस स्टेशन मध्ये भा.द.वि कलम 378/22, कलम 153 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच बरोबर अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले हे करीत आहेत गावात शांतता नांदावी यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here