Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»जंगलात भडकला भयंकर वणवा : पाहूनच धडकी
    अपघात

    जंगलात भडकला भयंकर वणवा : पाहूनच धडकी

    शेकडो झाडे जळून खाक; आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 10, 2026No Comments218 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    दक्षिण युरोपच्या तीव्र उष्णतेच्या लाटेत स्पेनच्या अल्मेरिया जंगलात वणवा भडकला आहे. वणवा भडकल्यानंतर या आगीत शेकडो झाडे जळून खाक झाली आहेत. तर आतापर्यंत घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण भागातील अल्मेरियाच्या लॉस गैलार्डोसमधील जंगलाला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच 150 हून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आपत्कालनी मंत्री एंटानियो सैन्ज यांनी ही आग विनाशकारी असल्याचे म्हटलं आहे.

    लॉस गैलार्डोस स्पेनच्या आंदालूसियामध्ये अल्मेरिया प्रांताची एक नगरपालिका आहे. या प्रांतातील एका गावात असलेल्या जंगलाला भीषण आग लागली. सध्या या भागात तापमान 40 डिग्री सेल्सिअसहून अधिक आहे. वीजेची तार तुटल्याने आग लागल्याचा संशय आहे. त्यात जंगलात उन्हाने वाळलेली पाने अधिक असल्याने आग सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली. याआधी दक्षिण फ्रान्समध्ये आठवड्याच्या सुरुवातीला एका जंगलाची सर्वत्र पसरली होती.

    या भीषण आगीत12 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. काही जणांचे मृतदेह हे वाहनात आढळले आहेत. स्पेनच्या सीमेवर 24 हून अधिक गावे आहेत. या सर्व गावांत जवळपास 10 हजारहून अधिक जण राहतात. या आगीच्या घटनेनंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आलं आहे. आगीमुळे अनेक मार्ग देखील बंद झाले आहे. आगीच्या धुरामुळे लोकांना श्वास घेण्यासही त्रास होत आहे. त्यामुळे बहुतांश जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

    स्पेनमध्ये 1950 सालानंतरची ही सर्वात भीषण उष्णतेची लाट मानली जात आहे. या तापमानाने उच्चांक गाठला आहे. काही भागांमध्ये 42 अंश सेल्सिअसपर्यंत तापमानाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या उष्णतेमुळे जमिनीचा मोठा भाग कोरडा पडल्याचेही माहिती मिळतेय. गेल्या वर्षी स्पेनमध्ये 9 लाख 71 हजार एकर जमीनीवरील झाडे जळून खाक झाले होते. या वर्षी लागलेल्या आगीने ग्रामस्थांचं टेन्शन वाढलं आहे. अनेक जण सरकार आणि प्रशासनाकडे मदतीची याचना करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026

    दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली

    September 6, 2026

    भयंकर! विषारी दारूमुळे ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif