कोयत्याने वार करून बँक मॅनेजरकडून १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

0

जळगावातील थरारक घटना ; घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल

जळगाव;- शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळी दरोडा टाकून  १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. . पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असून पोलिसांनी त्या दोन अज्ञात दरोडेखोरांचा तपास सुरु केला आहे.

कालींका माता मंदिर परिसरातील काशीबाई उखाजी कोल्हे विद्यालयाच्या जवळ स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. गुरुवारी सकाळी नऊ वाजता बँक उघडून नियमीतपणे कारभार सुरू झाल्यानंतर सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन युवक दुचाकीवरून बँकेत आले. त्यांच्याकडे कोयत्यासारखे धारदार शस्त्र होते. या शस्त्राच्या बळावर त्यांनी व्यवस्थापकासह पाच-सहा कर्मचार्‍यांना धमकावले. याप्रसंगी त्यांनी व्यवस्थापक राहुल महाजन यांच्या मांडीवर कोयत्याने वार देखील केले. यानंतर त्यांनी बँकेतील रोकड लांबवून पलायन केले.

अवघ्या काही मिनिटांमध्ये चोरट्यांनी लुट करून पलायन केले. त्यांनी बँकेतील १७ लाख रूपयांची रोकड लांबविल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बँकेत धाव घेतली. जखमी झालेल्या व्यवस्थापकांना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी एसपी एम. राजकुमार, अप्पर अधिक्षक चंद्रकांत गवळी, एमआयडीसिचे प्रभारी शंकर शेळके आदींनी सहकार्‍यांसह भेट दिली आहे. श्‍वान् पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. भर दिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. तर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.