Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • महामार्ग बायपासचा अट्टाहास अखेर नडला!
    • प्रवास ग्रंथालयांचा : माहिती संग्रहालय ते आधुनिक ग्रंथालय!
    • ‘डॉल्फिन’ आणि ‘चान-होम’ चक्रीवादळांमुळे भारताला धोका
    • अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!
    • बापरे! भटक्या श्वानाचा कहर; १३० जणांना चावला!
    • ए.आर. रहमानच्या मुलाचा मध्यरात्री भीषण अपघात
    • फुटलेल्या सहा खासदारांमध्ये चलबिचल वाढली
    • संघर्ष पेटला : झारखंडमध्ये जंतरमंतरसारखी पुनरावृत्ती
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»फरार आरोपीसह महिला संशयित ताब्यात
    गुन्हे वार्ता

    फरार आरोपीसह महिला संशयित ताब्यात

    महिलेवरील हल्ला प्रकरणात पोलिसांचा तपास वेगात
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 14, 2026No Comments335 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    भडगाव शहरातील महिलेवर झालेल्या गंभीर हल्ला प्रकरणात पोलिसांनी महत्त्वाची कारवाई करत गुन्ह्यातील फरार आरोपी आस्लम बिस्मिल्लाह शेख (रा. यशवंत नगर, भडगाव) यास शोध घेऊन ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणातील आणखी एका महिला संशयितास चाळीसगाव येथून ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

    प्राथमिक माहितीनुसार, दि. १२ जून २०२६ रोजी रात्री घडलेल्या या घटनेत एका महिलेवर गंभीर स्वरूपाचा हल्ला झाल्याचा आरोप असून या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) अंतर्गत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न यासह इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    घटनेत जखमी झालेल्या महिलेवर सध्या जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती वैद्यकीय देखरेखीखाली असल्याची माहिती समोर आली आहे.

    पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी व जखमी महिला यांच्यात पूर्वीपासून काही कारणांवरून वाद असल्याची प्राथमिक माहिती असून त्यातूनच ही घटना घडल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. तथापि, घटनेमागील नेमके कारण, हल्ल्याचे स्वरूप आणि संबंधितांची भूमिका याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.

    या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या आदेशान्वये विशेष तपास पथक कार्यरत आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस निरीक्षक राहुल पाटील तसेच पोउनि सुशिल सोनवने इतर अधिकारी व कर्मचारी यांचा समावेश आहे.

    दरम्यान, घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून पुढील तपासाअंती अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अशी तशी नव्हे; चक्क बसचीच केली चोरी!

    August 10, 2026

    धानोऱ्यातील शेतकऱ्याच्या खात्यावर सायबर डल्ला!

    August 9, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif