किम कॉटन ठरल्या पहिल्या महिला अम्पायर… पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग करण्याचा बहुमान

0

 

क्रीडा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायरिंग करण्याचा बहुमान न्यूझीलंडच्या महिला पंच किम कॉटन यांनी मिळवला आहे. त्यांनी बुधवारी आज 5 एप्रिल रोजी न्यूझीलंड आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तीन टी-20 मालिकेतील दुसऱ्या टी-20 सामन्यात अंपायरिंग करताना त्यांनी इतिहास रचला आहे. याचबरोबर त्यांच्या नावाची इतिहासाच्या पानात सुवर्णाक्षरांनी नोंद झाली. त्या न्यूझीलंडच्या पंच आहेत आणि त्यांनी आतापर्यंत शेकडो सामन्यांमध्ये पंच म्हणून जबाबदारी पार पडली आहे.

https://twitter.com/BLACKCAPS/status/1643428104243929089?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1643428104243929089%7Ctwgr%5Ed8e532abc009322fa9298687fbf70e6a578d5d01%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fsports%2Fcricket%2Fkim-cotton-new-zealand-becomes-first-female-umpire-in-mens-international-match-nz-vs-sl-2nd-t20-1165487

जाणून घेऊया किम कॉटन यांची कारकीर्द… 2018 पासून किम कॉटन यांनी 24 महिला एकदिवसीय सामन्यांमध्ये अंपायरिंगची भूमिका बजावली होती. यादरम्यान टीव्ही अंपायर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. याशिवाय त्यांनी सहा फर्स्ट क्लास, चार लिस्ट-ए आणि 25 टी-20 सामन्यामध्ये अंपायरिंग केलं आहे. 2020 मध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात हॅमिल्टनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथमच किम कॉटनने पुरुषांच्या सामन्यात त्यांची उपस्थिती होती बाजी मारली होती. तेव्हा त्यांनी टीव्ही अंपायर म्हणून जबाबदारी पार पाडली होती. 48 वर्षीय किम कॉटन यांनी आतापर्यंत दोन T20 आंतरराष्ट्रीय आणि 54 महिला T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अंपायरिंग केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.