जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव येथील गुरु रविदास क्लबच्या वतीने रविवार दि. 12 जुलै रोजी सकाळी 10 वाजता केमिस्ट भवन, जिल्हा पेठ, जळगाव येथे जिल्ह्यातील चर्मकार समाजातील गुणवंत विद्यार्थी समारंभाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या गुणवंत विद्यार्थी गौरव समारंभाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री ना. संजय सावकारे यांच्या शुभहस्ते होणार असून याप्रसंगी ना. गिरीश महाजन (जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य) ना. गुलाबराव पाटील (पाणीपुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री जळगाव जिल्हा ) खा. स्मिता वाघ, आमदार राजू मामा भोळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच महापौर दीपमाला काळे, माजी महापौर विष्णू भंगाळे, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, नगरसेवक सुरेखा नितीन तायडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माजी उपशिक्षणाधिकारी मा. यशवंतराव ठोसरे उपस्थित असतील तर मा. निळकंठराव गायकवाड (माजी प्राचार्य, जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था, जळगाव) हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तसेच डॉ. राजेंद्र बाविस्कर (सेवानिवृत्त मुख्य अभियंता, दीपनगर) यांच्या विशेष उपस्थितीत सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. असे गुरु रविदास क्लबचे अध्यक्ष डॉ. सुनील सूर्यवंशी, सचिव प्रदीप शेकोकार, प्रा. विठ्ठल सावकारे, धीमंत पी. आर. आंबेडकर, संजय बाविस्कर, प्रा. स्मिता जयकर यांनी कळविले. सदर कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्यातील चर्मकार समाजातील इयत्ता दहावी व बारावी तसेच पदवी, पदव्युत्तर, संशोधन, विविध स्पर्धात्मक परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा, नीट, जेईई, सी ई टी व तत्सम परीक्षांमध्ये यशस्वी विद्यार्थ्याची नोंदणी करण्यात आलेली होती.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. संजय सूर्यवंशी, डी. डी. ठोसरे, ज्योती निंभोरे, गजानन दांडगे, प्रा. संदीप शेकोकार, प्रा. गणेश सूर्यवंशी डॉ. संजय भटकर, खंडुजी पवार, कैलास विसावे, डॉ. सुनील निंभोरे, युवराज घोलाणे, कैलास सोनवणे, जगन्नाथ निंभोरे, दिलीप दांडगे, निवृत्ती सूर्यवंशी, संजय निंभोरे, प्रा. आत्माराम चिमकर, प्रा. माणिक बागले, गणेश राऊत, अरुण नेटके, सुनील वानखेडे, अशोक लोखंडे, अनिल वानखेडे, अशोक भारुडे, गणेशजी सुरळकर, कैलास वाघ, निवृत्ती सूर्यवंशी, प्रा. संदीप शेकोकार, ज्योती निंभोरे, छाया जयकर, प्रा. माणिक बागले, प्रा. ए. टी. चिमकर, डॉ. संपतराव वानखेडे, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. कैलास वाघ, डॉ. गणेश भारुडे, डॉ. सुनील तायडे, डॉ. दिलीप जयकर, डॉ. प्रकाश सुरवाडे, खंडूजी पवार, केशव ठोसरे, डी. डी. ठोसरे, अरुण नेटके, सोपान भवरे, दिलीप दांडगे, युवराज घोलाणे, सुनील वानखेडे, संदीप सूर्यवंशी, सुरेश वाघमारे, सुरेश घुले, गणेश दांडगे, गणेश राऊत, स्वप्निल ठोसरे, संतोष चंदनकर, शांताराम गवळे, डी. ए. सोनवणे, रवींद्र देवरे, सुधाकर मोरे, संजय निंभोरे, अनिल वानखेडे, अशोक लोखंडे, दीपक अहिरे, प्रशांत निंभोरकर, संजय भारुडे, रामलाल ब्राह्मणे, अमोल बाविस्कर, पुरुषोत्तम चिमणकर, नितीन दांडगे, निलेश गोरे, अशोक भारुडे, मनोहर शेकोकार, दशरथ देशमाने, मंगल रेघे, देविदास खैरनार, अशोराज तायडे आदी मंडळी परिश्रम घेत आहेत. तरी जिल्ह्यातील चर्मकार बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थिती देण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


