Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»झोपेत असलेल्या दोन मुलांवर बापाचा कुऱ्हाडीने हल्ला
    गुन्हे वार्ता

    झोपेत असलेल्या दोन मुलांवर बापाचा कुऱ्हाडीने हल्ला

    कौटुंबिक शोकांतिका : मुलीचा मृत्यू, मुलाची मृत्यूशी झुंज
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 2, 2026No Comments961 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वडती गावात रविवारी सकाळी घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर सुन्न झाला. एका ५० वर्षीय व्यक्तीने स्वतःच्या दोन मुलांवर ते झोपेत असताना कुऱ्हाडीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात १३ वर्षीय मीरा सुभाष भिलाला हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर ११ वर्षीय रामु सुभाष भिलाला गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.

    घटनेनंतर आरोपी सुभाष गोपाळ भिलाला हा घटनास्थळावरून पळून गेला होता. माहिती मिळताच अडावद पोलिसांनी तातडीने शोधमोहीम हाती घेत जंगल परिसरातून त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे.

    प्राथमिक तपासात, दोन्ही मुले घरात झोपेत असताना त्यांच्यावर धारदार कुऱ्हाडीने वार करण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. कौटुंबिक वाद, मानसिक अस्थिरता किंवा अन्य कोणते कारण आहे का, याचा पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.

    घटनेनंतर वडती गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आवश्यक पुरावे जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास अडावद पोलीस करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif