Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»देवदर्शनासाठी गेलेल्या बाप-लेकाचा नर्मदा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू
    अपघात

    देवदर्शनासाठी गेलेल्या बाप-लेकाचा नर्मदा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveAugust 28, 2026No Comments848 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जबलपूर येथे देवदर्शनासाठी गेलेल्या एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील बाप-लेकाचा नर्मदा नदीच्या तीव्र प्रवाहात बुडून दुर्दैवी मृत्यू; मुलाचा मृतदेह अद्याप शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

    एरंडोल तालुक्यातील खडके खुर्द येथील रहिवासी गणेश शांताराम पाटील (वय 32) आणि त्यांचा 10 वर्षीय मुलगा लकी गणेश पाटील हे मित्रांसोबत रेल्वेने जबलपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. जबलपूर जिल्ह्यातील नर्मदा नदीकाठी दर्शनासाठी गेले असताना ही काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.

    मिळालेल्या माहितीनुसार, लकी पाटील हा नर्मदा नदीत अंघोळ करण्यासाठी उतरला होता. मात्र पाण्याच्या खोलीचा व प्रवाहाचा अंदाज न आल्याने त्याचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला. मुलगा पाण्यात बुडत असल्याचे व मदतीसाठी आरडाओरड करत असल्याचे वडील गणेश पाटील यांच्या निदर्शनास आले. मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र पाण्याचा प्रवाह अत्यंत तीव्र असल्याने दोघेही प्रवाहात वाहून गेले.

    ही दुर्दैवी घटना 26 ऑगस्ट 2026 रोजी घडली. या दुर्घटनेत 10 वर्षीय लकी पाटील आणि त्याचे वडील गणेश पाटील यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

    घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थ आणि जबलपूर प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य व शोधमोहीम सुरू करण्यात आली. पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे शोधकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. 27 ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास मच्छीमारांना गणेश पाटील यांचा मृतदेह आढळून आला. मात्र लकी पाटील याचा मृतदेह अद्याप मिळालेला नसून त्याचा शोध सुरू आहे.

    दरम्यान, खडके खुर्द येथील ग्रामस्थांनीही जबलपूर गाठून शोधमोहीमेत सहभाग घेतला आहे. एकाच कुटुंबातील बाप आणि मुलाचा अशा प्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने खडके खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    पर्यटकांनी घ्यावी खबरदारी

    पावसाळ्यात नदी, धरणे, धबधबे आणि इतर जलस्रोतांमध्ये पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज नसताना धोकादायक ठिकाणी उतरू नये. प्रशासनाने बंदी घातलेल्या किंवा निर्बंध असलेल्या पर्यटनस्थळांवर जाणे टाळावे. तसेच नदी अथवा धोकादायक जलप्रवाहाच्या अगदी जवळ उभे राहून सेल्फी काढणे किंवा अतिउत्साह दाखवणे टाळावे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif