Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»शेतात काम करताना मधमाश्यांचा जीवघेणा हल्ला!
    अपघात

    शेतात काम करताना मधमाश्यांचा जीवघेणा हल्ला!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveFebruary 11, 2026No Comments2 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    यावल शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना घडली असून शेतात काम करत असताना असंख्य मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे यावल शहरासह परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

    पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गणेश रविंद्र पाटील (वय ३८, रा. देशमुख वाडा, यावल) हे दिनांक १० फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी सुमारे २.३० वाजेच्या सुमारास निमगाव शिवारातील खुबसिंग नयनसिंग पाटील यांच्या मालकीच्या शेतात कामासाठी गेले होते. शेतातील काम सुरू असताना तेथील एका झाडावर असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्यात अचानक हालचाल झाल्याने असंख्य मधमाश्यांनी गणेश पाटील यांच्यावर एकाच वेळी हल्ला चढवला. मधमाश्यांच्या तीव्र चाव्यांमुळे गणेश पाटील गंभीर जखमी झाले व काही वेळातच ते बेशुद्ध पडले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेने कुटुंबीयांसह उपस्थितांचे मन सुन्न झाले.

    या प्रकरणी राहुल रमेश झामरे (वय ३३) यांनी दिलेल्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. घटनेची नोंद अधिकृतरीत्या करण्यात आली आहे. गणेश पाटील हे रविंद्र पाटील कुटुंबातील एकुलते एक पुत्र होते. त्यांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून देशमुख वाडा परिसरासह संपूर्ण यावल शहरात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांकडून कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केल्या जात आहेत.

    #farmers accident attack bees Death jalgaon Yaval
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026

    नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.