Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    • आईसोबतच्या मैत्रीचा राग; रेल्वे कर्मचाऱ्याला संपवले
    • विद्यानंद बापटांना गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहरात बंदी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»फटाका विक्रेत्यांना तात्पुरत्या विक्री स्टॉल परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन
    जळगाव

    फटाका विक्रेत्यांना तात्पुरत्या विक्री स्टॉल परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 30, 2025Updated:September 30, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फटाका विक्रेत्यांना तात्पुरत्या विक्री स्टॉल परवान्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

    जळगाव लोकशाही न्यूज नेटवर्क

    दिपावली सणानिमित्‍त फटाका विक्रेत्यांना तात्‍पुरते फटाके विक्रीचे परवाने घेणे आवश्यक आहे. त्यासाठी विहित पद्धतीने सर्व बाबींची पुर्तता करूनच अर्ज सादर करण्यात यावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

    यामध्ये जळगांव शहर, जळगांव तालुका व जामनेर तालुक्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात फटाका विक्री परवाना देण्यात येतो. सदरचा परवाना मिळवण्यासाठी फटाका विक्रेत्यांना उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागणार आहे. या अर्जासोबत फटाका विक्रेत्यांना काही कागदपत्रांची पुर्तता करावी लागणार आहे. ज्यामध्ये अर्ज व अर्जदाराचे 2 फोटो, जागेचा पुरावा व नकाशा, ज्याच्या जागेवर दुकान आहे त्यांचे संमतीपत्र / करारनामा / 100 रुपयाचा स्टॅम्प, महानगरपालिका किंवा ग्रामपंचायत यांचा नादेय प्रमाणपत्र यासोबतच पोलीस विभागाचे ना-हरकत प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र 100 रुपये स्टॅम्पवर आणि चलन आवश्यक असणार आहे.

    तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज आणि सर्व कागदपत्रे कार्यालयास सादर केल्याशिवाय कुणालाही चलन पास करुन परवाना मिळणार नाही. याची सर्व फटाका विक्रेत्यांनी नोंद घ्यावी. तसेच कुणीही विनापरवाना फटाका विक्री करणार नाही याची दक्षता घ्यावी, विनापरवाना विक्री केंद्र सुरु केल्यास संबधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असे आवाहन विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

    Firecracker vendors jalgaon Jamner temporary stall licenses
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार

    September 11, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif