Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ठाकरेंची साथ सोडण्याच्या निर्णयाबाबत निंबाळकरांचे मोठे विधान
    • 15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार
    • कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ
    • अमेरिकेत ऐन दिवाळी समारंभात गोंधळ
    • दिवाळी : दंतकथांमागील शहाणपण
    • हे पैसे तुमचे आहेत.. मोदीच्या बापाचे पैसे नाहीत!
    • दिवाळी सण उजळला, शेतकऱ्यांमध्ये मात्र अंधार!
    • फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6 नव्हे तर 12 हजार!
    कृषी

    शेतकऱ्यांना पीएम किसानचे 6 नव्हे तर 12 हजार!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2025No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी पीएम किसान योजना सुरू करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत 21 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात DBT पद्धतीने थेट जमा करण्यात आली आहेत. या खात्यांमध्ये जवळपास 4.09 लाख कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. आता शेतकऱ्यांना 22 व्या हप्त्याची प्रतिक्षा आहे. या योजनेतंर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये मिळतात. या रक्कमेत तीन हप्ते थेट बँक खात्यात जमा होतात. अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. तर जास्त उत्पन्न असणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळत नाही.

    डिसेंबर 2024 मध्ये संसद समितीने सूचना दिली होती की, पीएम किसान योजनेची वार्षिक रक्कम 6 हजार रुपयाऐंवजी आता ती 12 हजार रुपये करण्यात यावी. त्यामुळे आता नवीन वर्षात शेतकऱ्यांच्या खात्यात 12 हजार रुपये जमा होतील अशी चर्चा सुरू झाली आहे. 22 वा हप्ता फेब्रुवारी 2026 मध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षात शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

    शेतकरी कल्याण मंत्रालयाचे राज्य मंत्री रामनाथ ठाकूर यांनी यासंबंधी खुलासा केला आहे. हप्ता वाढवण्याची चर्चा सुरू असताना त्यांनी मोठे वक्तव्य केले आहे. त्यांच्यामते सरकारकडे ही रक्कम वाढवण्याविषयीचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही. आता सध्याची 6,000 रुपयांची रक्कम कायम असेल. ती वाढवण्याचा सध्या कोणताही विचार नाही.

    फार्मर आयडीची अट या योजनेत नव्याने घालून देण्यात आली आहे. त्याविषयी सरकारने एक बाब स्पष्ट केली आहे. त्यानुसार, ज्या राज्यात फार्मर आयडीचे काम सुरू आहे. त्या राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडीची गरज आहे. सध्या एकूण 14 राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. तर ज्या राज्यात फार्मर आयडीची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. तिथल्या शेतकऱ्यांना सध्या या अटीतून सवलत देण्यात आली आहे.

    सरकारने नुकताच 21 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. त्यामुळे दोन हप्त्यातील अंतर पाहता पुढील हप्ता हा पुढील वर्षात जानेवारीच्या अखेरीस अथवा फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बँकेत जमा होऊ शकतो. यासंबंधीची अपडेट पीएम किसान योजनेच्या साईटवर कळेल.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #krishi farmer Farming PM Kisan
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    15 डिसेंबरपर्यंत शेतातील बोअरवरील बंदी उठविणार

    November 8, 2026

    फार्मर आयडीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

    November 7, 2026

    महाराष्ट्रासह ७ राज्यांत एसआयार मुदतवाढ

    November 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif