Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!
    • लाडक्या बाप्पांचे उत्साहात आगमन!
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»कृषी»कांद्याने रडवलेले शेतकरी आक्रमक : विरोधकांची साथ
    कृषी

    कांद्याने रडवलेले शेतकरी आक्रमक : विरोधकांची साथ

    संतप्त शेतकऱ्यांनी थेट मुंबई-आग्रा महामार्ग रोखला
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2026No Comments137 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने त्याविरोधात महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी मुंबई-आग्रा महामार्ग रोखला आहे. त्यामुळे दूर दूरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चांदवड येथे वाहतूक पूर्णपणे कोलमडली आहे. कांदा प्रश्नी शेतकऱ्यांनी महामोर्चा काढला आहे. नाशिकमधील शेतकऱ्यांच्या क्रांती महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधान परिषदचे आमदार अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यासह अनेक नेते, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. सरकारच्या धोरणाविरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. अनेक नेत्यांनी गळ्यात कांद्याची माळ घातली आहे. तर आंदोलकांच्या गळ्यातही कांद्याची माळ आहे.

    या मोर्चातून आमदार रोहित पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. या मोर्चाचे प्रतिनिधित्व सामान्य शेतकरी करत आहेत. आम्ही फक्त सहभागी होतो आहो. 18 तारखेला मोर्चा झाला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले 24 रुपये भाव देऊ आणि आता म्हणतात 12 रुपये दिला. आता सरकारवर प्रेशर आलं आहे. मोर्चाच्या आधी साडे पंधरा रुपये रेट वाढवला. त्यात काय होणार? नाफेडकडून फक्त 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे. आमची मागणी आहे प्रदेशात देखील कांदा विकावा. ज्यांनी कांदा विकला त्यांना अनुदान द्या. आमचा अंदाज आहे शेतापासून मार्केट पर्यंत येण्यासाठी 1 लाख रुपये लागतात. पाऊस देखील कमी पडण्याची शक्यता आहे पुढचे 3 वर्ष शेतकऱ्यांनी जगायच कसे हा प्रश्न आहे. आज सरकार मध्ये चर्चा MLC कोणते सीट कोणाला ही चर्चा सुरू आहे. डिझेलसाठी रांगा कराव्या लागतात. शेतकरी काळा बाजार करतात असे नेते मंडळी आरोप करतात. शेतकर्‍यांच्या पाठीशी कोणी तरी उभ राहण गरजेचं आहे. नाफेडकडून घोळ होत असल्याचा आरोप पवारांनी केला.

    शिवसेना (ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी सरकारवर मोठा घाणाघात केला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा प्रश्न बिकट झालाय. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. सरकार कांदा उत्पादक आणि जनतेची दिशाभूल करते. कोणताच भाव मिळाला नाही आणि कोणाची काही खरेदी केली नाही. या कांद्याला भाव मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. आज आम्ही सर्व कांदा उत्पादक शेतकर्‍यांसाठी रस्त्यावर उतरलो आहोत.बारा रुपये दर जाहीर करून डिक्लेर करून दहा-बारा दिवस झाले. एखाद्या क्विंटल शेतकऱ्याचा खरेदी केला एखादी पावती सरकारने आम्हाला दाखवावी घोषणेला काय अर्थ असा मोठा आरोप दानवे यांनी सरकारवर केला.

    काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा सोलापूरमध्ये कांदा प्रश्नी आंदोलन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प तात्यांच्या आहारी गेलेत. ट्रम्प बोले मोदी डोले अशी अवस्था झालीय. अदानी यांचे कर्ज माफ करण्याचे काम मोदी सरकार करत आहेत. ये तो शुरुवात है आंदोलन अभी बाकी है. आम्ही या सरकारचा धिक्कार करतोय, हे आंदोलन शेतकऱ्यांचे असल्याचे शिंदे म्हणाल्या.

    आंदोलनातील बैलगाडी बिथरली. त्यामुळे आमदार रोहित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शिवसेना नेते अंबादास दानवे, यांना बैलगाडीवरून उतरतपायी महामोर्चात सहभागी झाले. बैल म्हणतो सरकारला जाऊन धडकतो. जर बैलगाडी समोर सरकार आले असते तर त्यावर धडक ओले असते, अशी प्रतिक्रिया त्यावर आमदार रोहित पवार यांनी दिली.

    गंगापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला अत्यल्प दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला प्रतिकिलो अवघा सव्वा रुपया भाव मिळाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सोमवारी सायंकाळी बाजार समितीच्या गेटसमोरच कांदा रस्त्यावर फेकून देत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. गंगापूर-वैजापूर महामार्गावर झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. सोमवारी दुपारच्या सत्रात अनेक शेतकरी कांदा विक्रीसाठी गंगापूर बाजार समितीत दाखल झाले होते. मात्र लिलावादरम्यान जाहीर झालेल्या दरांनी शेतकरी हताश झाले. नरहरी रांजणगाव येथील शेतकरी लक्ष्मण दुशिंग यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल अवघे 125 रुपये, तर अरबाज सय्यद आणि वाहेगाव येथील शेतकरी गणेश शेवाळे यांच्या कांद्याला प्रतिक्विंटल केवळ 130 रुपये दर मिळाला. मिळालेल्या दरातून वाहतूक खर्चही निघत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात तीन हजार गणेश मंडळ; 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त!

    September 14, 2026

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif