कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

0

विवरे ता. रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

रावेर तालुक्यातील विवरे खुर्द येथील चिनावल रस्त्यावर राहात असलेल्या शेतकरी हिरामण सोनजी सांवत (वय ६३) यांनी आज राहत्या घरी इंगलला साडी बांधून आत्महत्या केली आहे.

शेतकरी हिरामण सोनजी सांवत यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली आहे. निंभोरा पोलिसात सदाशिव सोनजी सावंत रा. विवरे खुर्द यांनी फिर्याद दिल्याने आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पूढील तपास सह पो नि. गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो. कॉ. विकास कोल्हे करीत आहे.

मयताचे शवविच्छेदन रावेर ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते समाधान सावंत (बबलु) पंकज सावंत यांचे वडील होत.

Leave A Reply

Your email address will not be published.