Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»दिलासा.. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी फक्त 200 रुपयात
    महाराष्ट्र

    दिलासा.. जमिनीची हिस्सेवाटप मोजणी फक्त 200 रुपयात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 21, 2025No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    जमिनीच्या हिस्सेवाटपावरून अनेक वाद होताना आपण पाहत असतो. या जमिनीच्या  वाटपासाठी मोठा खर्च येतो. जमिनीची खरेदी विक्री, न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरची मोजणी प्रक्रिया, त्यासाठीचे शुल्क अधिक, जादा असल्याची चर्चा तर होतेच. आता जमिनी मोजणी बाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मोजणी शुल्कात मोठी कपात करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केला आहे.

    केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. शेतकर्‍यांवर आर्थिक भार पडू नये, हा यामागील उद्देश आहे.पूर्वी हिस्सेमोजणी शुल्क एक हजार ते चार हजार रुपे प्रति हिस्सा आकारण्यात येत होते. हे शुल्क आता थेट 200 रुपयांवर आणण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा मोजणी खर्च वाचणार आहे.

     

    जमीन मोजणी प्रक्रिया ऑनलाईन

    भूमी अभिलेख कार्यालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करता येते. पूर्वीसारख्या कार्यालयात खेटा मारण्याची गरज नाही. एका क्लिकवर काही कागदपत्रांसह शुल्क भरून जमीन मोजणीसाठी अर्ज करता येतो. केवळ 200 रुपये मोजणी शुल्क भरून एकत्र कुटुंबाच्या जमिनीचे नोंदणीकृत वाटणीपत्र व नकाशे देण्याचा अतिशय महत्वाचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांचा मोजणी खर्च वाचणार आहे.

     

    तीन प्रकारे होते मोजणी

    साधी मोजणी – साधी मोजणीला जास्त काळ लागतो. सहा महिन्यात ही मोजणी करण्यात येते. सरकार दरबारी त्यासाठी 1000 रुपये जमीन मोजणी शुल्क जमा करावे लागते.

     

    जलद मोजणी – शेतकऱ्याला जर जमिनीची जलद मोजणी करायची असेल तर 2000 रुपये भरावे लागतात. तरीही या मोजणीसाठी तीन महिन्यांची प्रक्रिया आहे.

     

    अतिजलद मोजणी – या मोजणीसाठी शेतकऱ्याला 3000 रुपये जमा करावे लागतात. जलद मोजणीसाठी तीन महिने तर अतिजलद मोजणीसाठी एक हजार रुपये अधिक द्यावे लागतात.

     

    Chandrashekhar Bawankule Farmers Land allotment calculation
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif