शेतकऱ्यांना थेट त्यांच्या घरी पुरस्कार देऊन सन्मानित

चंद्रपूर तहसील कार्यालयाचा उपक्रम

0

 

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

तहसील कार्यालय चंद्रपूरतर्फे १८ ऑक्टोबर २०२५ रोजी सामाजिक वंचित घटकांतर्गत असलेल्या शेतकऱ्यांच्या कार्याची जाणीव घेऊन मंडळ अधिकारी चंद्रपूर प्रविण वरभे यांच्या संकल्पनेतून कार्यक्षेत्रातील तीन प्रगतिशील शेतकऱ्यांना बळीराजा सन्मान पुरस्कार २०२५प्रदान करण्यात आला. या उपक्रमाचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा योग्य सन्मान मिळावा आणि त्यांच्या श्रमाला लोकसमोर मान्यता मिळावी, जेणेकरून या समाजातील महत्व कमी मानले जाणाऱ्या मुख्य अनुकरणीय प्रोत्साहन मिळाला.

यावेळी पुरस्कार वितरण समारंभात तहसीलदार विजय पवार, नायब तहसीलदार सचिन खंडाळे, मंडळ कर्तव्यदक्ष अधिकारी प्रविण वरभे, ग्राम महसूल अधिकारी योगेश सागुळले यांसह दिनेश काकडे, विशाल कोसनकर, अमोल गोसाई, अनुप वघारे, संदीप थाटे कोतवाल आणि गावातील सरपंच व नागरिक उपस्थित होते. या प्रसंगी दिवाळीच्या निमित्ताने हा सन्मान शेतकऱ्यांच्या घरी जाऊन थेट दिला गेला, ज्यामुळे त्या समारंभाचे औचित्य अधिक वाढले.

या वर्षी पुरस्कार प्राप्त शेतकरी

१) पांडुरंग गोविंदा भोयर (शिवणीचोर) निर्यातनुकूल मिरचीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे उत्पादनात मोठा बदल झाला असून निर्याताच्या क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

२) सौ. नीलिमा शालिक झाडे (चांदूर) महिला शेतकरी असून भाजीपाल्याचे पीक घेण्याच्या क्षेत्रात त्यांनी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादनात वाढ केली आहे. महिला सक्षमीकरण आणि शेतकऱ्यांच्या विकासात त्यांचा ठसा आहे.

३) तुकाराम बापूराव आवारी (आंबोरा) – दिव्यांग असूनही स्वतःच्या शेतातून पांदण रस्त्याला जागा देऊन सामाजिकहीताचा विचार करणारे शेतकरी. त्यांच्या या समर्पणामुळे समाजात त्यांचा वेगळा आदर आहे.

या पुरस्कारविभागातून शेतकऱ्यांचा मान-सन्मान वाढवण्यास तसेच त्यांच्याप्रतिसामाजिक दृष्टीकोन बदलण्यास मदत होईल, अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. तसेच शेतकरी हा समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा व अन्ननिर्मितीचा पाया असून सन्मान मिळणे त्यांच्या उत्साहाला नवा गती देणारा ठरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.