Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    • जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई
    • शेतीचे भविष्यातील खरे नायक फालीमधून घडतील!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या
    जळगाव जिल्हा

    कर्जबाजारी शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 19, 2022No Comments5 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धानोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मोहरद येथील तरुण शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून गळफास घेवून आत्महत्या केली. मोहरद ता. चोपडा येथील तरुण शेतकरी अनिल शामराव पाटील (४६) असे शेतकऱ्याचे नाव आहे.

    अनिल पाटील ते आई, वडील, पत्नी व मुलांसह राहत होते. त्यांचे वडील, पत्नी व लहान मुलगा धुळे येथे नातेवाईकांकडे लग्न समारंभासाठी गेले होते. अनिल यांची आई शेतात गेली होती. त्या शेतातून घरी आल्यावर अनिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. यावेळी त्यांनी आरडा ओरड केल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली.

    याबाबत पोलीस पाटील रजिया तडवी यांनी अडावद पोलीस स्टेशनला माहीती दिली. पोलीसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. अनिल पाटील यांच्यावर सततच्या नापिकीमुळे कर्जाचा डोंगर वाढला होता. घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांच्या निधनाने आई, वडील, पत्नी व लहान मुलांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    #dhanora Chopda Farmer suicide
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026

    धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!

    June 6, 2026

    जळगावात अंमली पदार्थ तस्करीविरोधात कारवाई

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif