ओझर येथे २७ वर्षीय शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या

0

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील ओझर येथील एका २७ वर्षीय इसमाने आपल्या राहत्या घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दि. १४ रोजी सकाळी उघडकीस आली असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

ओझर ता. पाचोरा येथील रहिवाशी किशन पंडित सोनवणे (वय २७) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारीपणाला कंटाळुन घराच्या छताला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सदरची घटना घरात कोणीही नसतांना झाल्याने दि. १४ रोजी सकाळी उघडकीस आली.

वृद्ध आई, पत्नी व मुली बाहेरगावी गेलेले असल्यामुळे किशन सोनवणे हे घरी एकटेच होते. अतिशय होतकरू व मन मिळावु स्वभाव असलेले किशन सोनवणे हे आपल्या नावे असलेली एक बिघा शेती सोबतच बाजार समितीमध्ये हमालीचे ही काम करायचे. त्यांच्या अशा अकस्मात मृत्यूने परिसरात शोककळा पसरली असुन मयत किशन सोनवणे यांचे पाश्चात्य वृद्ध आई, पत्नी, दोन मुली, एक लहान भाऊ, एक विवाहित बहिण असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.