Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शनिपेठ पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांच्या बदलीने प्रश्न सुटेल का?
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»अपघात»प्रसिद्ध कीर्तनकाराला भरधाव हायवा ट्रकने चिरडले
    अपघात

    प्रसिद्ध कीर्तनकाराला भरधाव हायवा ट्रकने चिरडले

    वारकरी परिषदेची बैठक आटोपून गावी परततांना..
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 1, 2026Updated:April 1, 2026No Comments569 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करणाऱ्या कीर्तनकारावर काळाने घाला घातला. वारकरी परिषदेची बैठक आटोपून दुचाकीने आपल्या गावी बारूळ येथे जातं असलेल्या ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर यांना एका भरधाव हायवा ट्रकने चिरडलं. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी नांदेड शहरातील सिडको परिसरात ही दुर्देवी घटना घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे.

    ह.भ.प मधुकर महाराज बारूळकर हे कंधार तालुक्यातील बारूळ येथील रहिवासी आहेत. शिवाय मराठा सेवा संघाच्या संत नामदेव तुकाराम वारकरी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष देखील होते. मागील अनेक वर्षापासून संघटनेत जोमाने काम करत होते. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करून अंधश्रद्धेपासून समाज दूर राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करायचे. मंगळवारी सिडको परिसरात आयोजित वारकरी परिषदेच्या बैठकीत त्यांनी हजेरी लावली होती. बैठक संपन्न झाल्यानंतर ते दुचाकीने परत बारूळ गावी जातं होते. सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास परिसरातील रुबी हॉटेल जवळ येताच पाठीमागून भरधाव वेगाने जातं असलेल्या हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली.

    ट्रकखाली चिरडल्या गेल्याने ह.भ.प मधुकर महाराज यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली. लग्न गर्दीचा फायदा घेत ट्रकचालक फरार झाला. या घटनेने हळहळ व्यक्त होतं आहे. नांदेड शहरात जड वाहतुकीवर बंदी आहे. असे असताना शहरात जड वाहनाची ये-जा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. सिडको हडको भागात रेती वाहतूक करणाऱ्या वाहनाची रेलचेल दिवसभर सुरूच असते. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेती वाहतूक करणाऱ्या ट्रकने अनेकांना चिरडल्याच्या घटना घडल्या आहे. अशा वाहनावर कायमस्वरूपी बंधन आणावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होतं आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.