Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    • दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नका!
    • आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला
    • अपुऱ्या पाणीपुरवठा योजना १५ दिवसांत पूर्ण करा!
    • मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज
    • जंतर-मंतर रोड आता आंदोलनापासून वंचित!
    • मनवेल ग्रामपंचायतीचा कारभार वाऱ्यावर : ग्रामस्थांची धावपळ
    • गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटना प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    गुन्हे वार्ता

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    जळगावमधील होमगार्डला चेन्नई सायबर कडून अटक
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 9, 2026No Comments252 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंटवरून फसवणूक करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात चेन्नई पोलिसांनी जळगावमधून एका व्यक्तीला बेड्या ठोकल्या आहेत. मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन असे आरोपीचे नाव आहे. तो होमगार्ड म्हणून कार्यरत असल्याची माहितीही समोर आली आहे.

    मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन हा विजय यांच्या नावाने एआय (AI) जनरेटेड व्हिडिओ आणि आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित करत होता. चेन्नई पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. चेन्नई वेस्ट झोन सायबर क्राईमच्या पथकाने नशिराबाद पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली.

    मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद जुनेद याने तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या नावाने सोशल मीडियावर बनावट (फेक) अकाउंट तयार केले होते. या अकाउंटवरून तो मुख्यमंत्र्यांचे AI व्हिडीओ तयार करत होता. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर ५ सप्टेंबर रोजी चेन्नई येथील वेस्ट झोन सायबर क्राईम पोलीस ठाण्यात अधिकृत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

    गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. या बनावट अकाउंटचे इंटरनेट लोकेशन जळगाव जिल्ह्यातील नशिराबाद येथे असल्याचे समोर आले. धागेदोरे मिळताच चेन्नई सायबर क्राईमचे एक विशेष पथक तातडीने जळगावात दाखल झाले. नशिराबाद पोलीस ठाण्याच्या सहकार्याने स्थानिक पातळीवर माहिती काढून पोलिसांनी संशयित होमगार्ड मोहम्मद जुनेद शेख कुतुबुद्दीन याला ताब्यात घेतले.

    नशिराबाद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई पोलीस आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून संशयित आरोपीला सोबत घेऊन चेन्नईकडे रवाना झाले आहेत. एका स्थानिक होमगार्डने थेट राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट अकाऊंट चालवल्याचे उघडकीस आल्याने जळगाव परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या बनावट अकाउंटमागे आरोपीचा काय उद्देश होता आणि यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा तपास चेन्नई पोलीस करत आहेत.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण

    October 15, 2026

    आकाशवाणी उड्डाणपुलावर तरुणावर काळाचा घाला

    October 15, 2026

    मेट्रो-रेल्वे सेवा बंद ठेवल्याने सर्वोच्च न्यायालय नाराज

    October 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif