Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मोर्चाची रणनीती ठरली!
    • आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना
    • कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा
    • एमपीएससी परीक्षा प्रक्रिया : विद्यार्थ्यांसमोर शासन झुकले
    • एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे
    • अभिजीत दिपके अभी तो बच्चा है, कच्चा है!
    • जळगावसह उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा विळखा अधिकच घट्ट!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»अकुलखेडा शिवारातील नकली दारूचा कारखाना उद्ध्वस्त!
    ताज्या बातम्या

    अकुलखेडा शिवारातील नकली दारूचा कारखाना उद्ध्वस्त!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 20, 2026No Comments418 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    चोपडा : शहर पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नियुक्ती होताच पोलीस निरीक्षक पवन देसले यांनी पहिल्याच दिवशी धडाकेबाज कारवाई करत बनावट दारूचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
    पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 18 एप्रिल रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास गिरिराज लॉन्सजवळील पत्री शेडमध्ये, अकुलखेडा शिवार, ता. चोपडा येथे बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी रविंद्र दिनकर पाटील (वय 40), राजवर्धन संजय पाटील (वय 31) आणि कपिल संजय पाटील (वय 30) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी बनावट व मानव जीवनास धोकादायक ठरणारी दारू तयार करून ती नामांकित कंपनीच्या नावाने विक्रीसाठी तयार करत असल्याचे तपासात समोर आले आहे. कारवाई दरम्यान पोलीसांनी मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला असून त्यात बनावट दारू, रिकाम्या बाटल्या, झाकण, रसायनयुक्त द्रव्य, तसेच इतर साहित्याचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 8 हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम व भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीसांकडून सुरू आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी केलेल्या या कारवाईमुळे पोलीस निरीक्षक पवन देसले यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आता गुरुजी सांगणार देश-विदेशात ऑनलाइन गणेश स्थापना

    September 13, 2026

    कविवर्य ना. धों. महानोर साहित्य , शेती – पाणी पुरस्कार सोहळा

    September 11, 2026

    एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांना फासले काळे

    September 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif