Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • ओझरखेडा तलावामध्ये हतनूर धरणाचे पाणी!
    • TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक
    • मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय
    • वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा
    • राजस्थानमधील व्यापाऱ्याकडून सात लाखांची फसवणूक
    • पुन्हा मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
    • खिडकीतून मण्यार आता घुसला अन् होत्याचे नव्हते!
    • भर पावसातली महाबळेश्वर पिकनिक थेट जीवावर बेतली
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अखेर फैयाज प्रेमजीचं बिंग फुटलंच!
    गुन्हे वार्ता

    अखेर फैयाज प्रेमजीचं बिंग फुटलंच!

    मोहरमला अनेकांच्या हत्येचा रचला होता कट
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 29, 2026No Comments425 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    मुंबईतील भायखळा परिसरात मोहरमच्या मिरवणूकीत घातपात करण्याचा मोठा कट रचणाऱ्या फैयाज प्रेमजीचं पितळ उघडं झालं आहे. अटकेत असलेल्या फैयाज प्रेमजी याने चौकशी दरम्यान मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मानसिकरित्या प्रचंड खचलेला होता. एवढंच नाही तर, फैयाज प्रेमजी संपूर्ण जगाला स्वतःचा शत्रू मानत होता… पोलिस अद्याप याप्रकरणी पुढील चौकशी करत आहे. सुरुवातीच्या चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना कथितरीत्या सांगितले की, त्याला जगाचा बदला घ्यायचा होता. सर्वांनी मिळून आपल्यावर अन्याय केला आहे, असं त्याला वाटत आहे. आरोपीला काही मानसिक आजार होता का आणि तो एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाकडून उपचार घेत होता का, याचाही तपास आता पोलीस करत आहेत.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फैयाज प्रेमजी याला बायकोने सोडलं आहे. बायकोने सोडल्यानंतर तो सतत तणावाखाली असायचा आणि निराश राहायचा. पोलिसांनी आरोपी फैयाज प्रेमजी याच्या वडिलांचा जबाब घेतला आहे. तर फैयाज प्रेमजी याची आई आणि बहीण सध्या इराण याठिकाणी राहत आहेत.

    तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीतून असं समोर आलं आहे की, मानवी शरीरावर झिंक फॉस्फाइडच्या विविध प्रमाणांचा काय परिणाम होतो, याची माहिती मिळवण्यासाठी आरोपीने आपल्या फोनवरील एका ‘एआय’ (AI) टूलचा वापर केला होता. तसेच, झिंक फॉस्फाइडचा स्रोत काय होता आणि ते त्याने कसं मिळवलं, याचाही तपास पोलीस करत आहेत.

    तपासादरम्यान, पोलिसांनी आरोपीचा मोबाईल फोन फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवला आहे. प्राथमिक चौकशीतून असे समोर आलं आहे की, मानवी शरीरावर झिंक फॉस्फाइडच्या विविध प्रमाणांचा काय परिणाम होतो, याची माहिती मिळवण्यासाठी आरोपीने आपल्या फोनवरील एका ‘एआय’ (AI) टूलचा वापर केला होता. तसेच, झिंक फॉस्फाइडचा स्रोत काय होता आणि ते त्याने कसे मिळवले, याचाही तपास पोलीस करत आहेत.

    पुणे पोलिसांच्या एका पथकाने त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा घरात मोठ्या संख्येने उंदीर आढळून आले. आरोपीला ‘झिंक फॉस्फाइड’सारख्या उंदीर मारण्याच्या रसायनांची माहिती असण्यामागे हेच कारण असावं, असा पोलिसांचा अंदाज आहे. सध्या पोलीस आरोपीच्या डिजिटल हालचाली, मेडिकल रिकॉर्डआणि संबंधित रसायनाची खरेदी या सर्व बाबींचा तपास करत आहेत. या प्रकरणातील फॉरेन्सिक अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    TET पेपरफुटी : सोलापुरातून प्रशिक्षण केंद्र चालकाला अटक

    August 11, 2026

    मंत्रिमंडळ बैठकीत ७ महत्त्वाचे निर्णय

    August 11, 2026

    वेल्हाळे कपिलेश्वर महादेव मंदिरात १७ ऑगस्टला मुकुट सोहळा

    August 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif