जनतेचे मिळालेले प्रेम आणि सहकारी यांची साथ कायम स्मरणात राहणार – अन्नपूर्णा सिंह

0

जनतेचे मिळालेले प्रेम आणि सहकारी यांची साथ कायम स्मरणात राहणार – अन्नपूर्णा सिंह

रावेर प्रतिनिधी
भारतीय पोलीस सेवेत निवड झाल्यावर फैजपूर विभागात सहा पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असतांना जनतेचे मिळालेले प्रेम आणि सहकारी यांची साथ कायम स्मरणात राहणार असल्याचे सहा पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांनी निरोप समारंभा प्रसंगी मनोगत व्यक्त करतांना सांगितले.

श्रीमती सिंह यांची अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून छत्रपती संभाजीनगर येथे बदली झाल्याने त्यांना रावेर, सावदा, फैजपूर, यावलं, निंभोरा या पोलीस स्टेशन कडून निरोप देण्यात आला.

यावेळी सावदा येथील कुलसूमबाई सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भुसावळ विभागाचे पोलीस उप अधीक्षक कृष्णान्त पिंगळे, रावेर तहसीलदार बंडू कापसे, यावलं तहसीलदार मोहनमाला नाझीरकर हे प्रमुख उपस्थित होते. तर रावेर पोनि डॉ विशाल जयस्वाल, यावल पोनि प्रदीप ठाकूर, सावदा सपोनि विशाल पाटील, निंभोरा सपोनि हरिदास बोचरे, सपोनि अंकुश जाधव, घनश्याम तांबे, फैजपूर पी एस आय मैनुद्दीन सय्यद,नीरज बोकील यांच्यासह सावदा येथील बाबू शेठ, डॉ सुरेश पाटील, प्रल्हाद बोन्डे, घुमा तायडे जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, श्याम पाटील, राजीव बोरसे, योगेश सोनवणे, सावन मेढे, सुनील कोंडे, युसूफ इब्राहीम, डिगंबर चौधरी नरेंद्र ढाके, सिमरन वानखेडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कृष्णान्त पिंगळे यांनी मनोगतात सांगितले की, पोलीस विभागात आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाल्यावर सुद्धा श्रीमती सिंह यांनी कधीही आपल्या अंगी तसा अहं भाव न बाळगता सर्वांना संभाळून घेत स्वभावाने मृदू आणि कर्तव्यात कठोरता असा संगम त्यांनी अंगीकारल्याने भविष्यात त्यांच्यासोबत काम करायला नक्कीच आवडेल. तर डॉ विशाल जयस्वाल यांनी देखील त्यांच्या प्रत्येक कामात मॅडम यांचे मार्गदर्शन कायम मोलाचे राहिले असल्याचे सांगून पोनि प्रदीप ठाकूर यांनी देखील आपले अनुभव सांगितले

Leave A Reply

Your email address will not be published.