फैजपूर नगरपालिका निवडणूक २०२५ : भाजपाचे बहुमत
दामिनी पवन सराफ नगराध्यक्षपदी विराजमान
फैजपूर ( प्रतिनिधी) फैजपूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने (भाजप) आपले वर्चस्व प्रस्थापित करत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. एकूण जागांपैकी भाजपाला ९ जागा मिळाल्या असून, नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाच्या उमेदवार दामिनी पवन सराफ यांनी १०,०८७ मतांसह दणदणीत विजय मिळवला.
निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केलेल्या निकालानुसार प्रभागनिहाय विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
प्रभाग १ अ : तडवी हकिम एमत (राष्ट्रीय काँग्रेस) – १,८३७ मते
प्रभाग १ ब : शेख सुमईय्या बी कुरबान (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – १,८२७ मते
प्रभाग २ अ : शे युनूस शेअयुब (एमआयएम) – १,३९२ मते
प्रभाग २ ब : शे सादीका शेख दानिश (राष्ट्रीय काँग्रेस) – १,५६६ मते
प्रभाग ३ अ : शे अनवर शे असगर (राष्ट्रवादी काँग्रेस – शरद पवार गट) – बिनविरोध
प्रभाग ३ ब : सफूरा बी महेमूद (राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गट) – ६,८७५ मते
प्रभाग ४ अ : भारंबे दिपाली जितेंद्र (भाजप) – ७३६ मते
प्रभाग ४ ब : चौधरी विनोद अरुण (अपक्ष) – ९६९ मते
प्रभाग ५ अ : केतन डिगंबर किरंगे (राष्ट्रीय काँग्रेस) – बिनविरोध
प्रभाग ५ ब : निलीमा महाजन (भाजप) – बिनविरोध
प्रभाग ६ अ : चौधरी जयश्री नरेंद्र (भाजप) – १,१०३ मते
प्रभाग ६ ब : सागर होले (भाजप) – बिनविरोध
प्रभाग ७ अ : इंगळे प्रियंका ईश्वर (राष्ट्रीय काँग्रेस) – ८३१ मते
प्रभाग ७ ब : मंडवाले महेंद्र अशोक (भाजप) – १,४५३ मते
प्रभाग ८ अ : नेहेते सुनिता अनंत (भाजप) – ९९६ मते
प्रभाग ८ ब : शे ईरफान शे ईकबाल (राष्ट्रीय काँग्रेस) – ९९१ मते
प्रभाग ९ अ : कोळी निकीता प्रकाश (भाजप) – १,३५६ मते
प्रभाग ९ ब : गाजरे सुरज रमेश (भाजप) – ९४७ मते
प्रभाग १० अ : सिद्धक्षवर वाघुळदे (भाजप) – बिनविरोध
प्रभाग १० ब : भावना संदिप भारंबे (भाजप) – ५३९ मते
प्रभाग १० क : चौधरी अमिता हेमराज (अपक्ष) – ६८१ मते
एकूण जागांचा तपशील :
भाजप : ९
राष्ट्रीय काँग्रेस : ५
अपक्ष : ३
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : २
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) : १
एमआयएम : १
निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. नवनिर्वाचित नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ यांच्यासह सर्व नगरसेवकांचे समर्थकांनी जल्लोष करीत अभिनंदन केले. भाजपाच्या या कामगिरीमुळे फैजपूर शहराच्या विकासाला नवीन गती मिळेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

