पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली

0

पायी जाणाऱ्या वृद्धेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावली

फैजपूर येथील घटना

यावल प्रतिनिधी फैजपूर शहरातील स्वामी नारायण मंदिर परिसरात एका वृद्ध महिलेला लक्ष्य करून अज्ञात दोघांनी दुचाकीवर येत गळ्यातील सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून नेल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली.

शारदा प्रदीप चौधरी (वय ६४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव) या पायी जात असताना अज्ञात दोघांनी अचानकपणे त्यांच्या गळ्यातील सुमारे ३० ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे १ लाख ६० हजार रुपये असलेली चैन लांबविल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली आहे.

या प्रकरणी रविवारी (७ डिसेंबर) फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मैनुद्दिन हबीब सैय्यद हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.