Friday, May 20, 2022

सलग १४ ट्विट करून फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

राज्याचं राजकारण सध्या चांगलेच तापले आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँगेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर अनेक आरोप करत टीका केली होती. त्यातच आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी १४ ट्विट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

- Advertisement -

बाबासाहेबांच्या विचारांची आठवण करून देत फडणवीसांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम ३७० ला कडाडून विरोध होता, एका बाजुला आपण थाटामाटात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करतोय पण दुसऱ्या बाजुला त्यांच्या विचारांना बाजुला करतो. बाबासाहेब आंबेडकरांचा आर्टिकल ३७० ला विरोध होता.

https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1514511633519083521?s=20&t=3InC9DtKeGN7TX7MqmKXTg

जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देण्यास त्यांचा विरोध होता. पण पवारांच यावर मत काय हे सर्वांनाच माहिती आहे. पवारांचे याबद्दलचे वेगवेगळे वक्तव्य आलं तरी कसलही आश्चर्य नाही. त्यांच्या पक्षाचा संपूर्ण इतिहास पाहिला तर अशाच पद्धतीने जातीयवादी राजकारण हा त्यांचा जुना ट्रॅक रेकॉर्ड आहे असं स्मरण करून राष्ट्रवादीने याबाबत घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.

तसेच फडणवीस म्हणाले की, काश्मीर फाईल्समध्ये काश्मिरी पंडितांच्या वेदनांचे चित्रण असताना असा दुटप्पीपणा का ? तुमच्या छबीला धर्मनिरपेक्षतेच्या अजेंड्याला धक्का बसेल म्हणून ? काश्मीर फाईल्स हा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. मग केवळ अनुनयाच्या हेतूने जातीय विद्वेष पसरविण्याचा प्रयत्न का ? असा सवाल देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना केला.

संविधानात धर्माच्या आधारावर आरक्षणाला विरोध असताना मुस्लिम आरक्षणासाठी सातत्याने पुढाकार का घेतला ? अल्पसंख्यक समाज कोणाचाही पराभव करू शकतो, हिंदू टेरर हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कुणी केला, सच्चर समितीचा अहवाल लागू करा अशी मागणी केली. मुंबई बॉम्बस्फोटानंतर १३ वा बॉम्बस्फोट हा मुस्लिम वस्तीत झाल्याचे शरद पवारांनी खोटे सांगितले.

नवाब मलिक यांना अटक होताच ते मुस्लिम आहेत, म्हणून त्यांचा संबंध दाऊदशी जोडला जातोय असं पवार म्हणाले. इशरत जहाँ ही निर्दोष होती असंही त्यांनी सांगितले होते. एवढेच नाही तर राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी इशरतच्या मदतीसाठी प्रयत्न केले. २०१२ मध्ये आझाद मैदानात हिंसाचारानंतर कशी ढिलाई दाखविली आणि रझा अकादमीवर कारवाई केली नाही असा आरोप करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतात हे स्वीकारार्ह नाही असा सवाल फडणवीसांनी पवारांना केला आहे.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या