फडणवीसांचा ठाकरेंना धक्का, 35 नेत्यांचा राजीनामा

0

 लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना ठाकरे गटाला विधानसभा निवडणुकीनंतर एकावर एक दणके बसत आहेत.  सोमवारी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी राजीनामा दिला.  2024 च्या विधानसभा निवडणुकीत एकनाथ पवार हे लोहा – कंधार मतदारसंघाचे ठाकरे गटचे उमेदवार देखील होते. एकनाथ पवार यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना ठाकरे गटाला नांदेडमध्ये मोठा धक्का बसला आहे. या धक्क्यातून सावरत नाहीत तोच आता भाजपनं छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या 35 स्थानिक नेत्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे, त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला धक्क्यावर धक्के बसत असूनअनेक नेत्यांनी महायुतीची वाट धरल्याचं पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीमधील शिवसेना ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. शिवसेना ठाकरे गटातील नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत. सोमवारीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्य संघटक एकनाथ  पवार यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं आहे. जळगावमधील शिवसेना ठाकरे गटाचे काही नाराज माजी नगरसेवक हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत अशी देखील एक बातमी समोर येत आहे.

दुसरीकडे शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी काल मोठा दावा केला आहे. 23 जानेवारीला राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार आमच्या संर्पकात असून, ते शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत, असं शेवाळे यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.