डोळ्यांची दृष्टी कमी होतेय? या ‘व्हिटॅमिन्स’च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करु नका!
मुंबई | प्रतिनिधी ;- मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही आणि कॉम्प्युटरसमोर तासन्तास घालवणं, तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी यांचा थेट परिणाम आपल्या डोळ्यांवर होत असल्याचं समोर आलं आहे. डोळ्यांना आवश्यक असलेली पोषणमूल्यं वेळेत न मिळाल्यास दृष्टी कमी होण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
विशेषतः व्हिटॅमिन्सची कमतरता ही डोळ्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करणारी ठरते. यामध्ये प्रमुखतः खालील व्हिटॅमिन्सचा समावेश होतो:
व्हिटॅमिन A (रेटिनॉल) – डोळ्यांना ओलावा देऊन कॉर्नियाचे संरक्षण करतं. गाजर, पालक, ब्रोकली आणि पिवळ्या भाज्यांत मुबलक प्रमाणात आढळतं.
व्हिटॅमिन B कॉम्प्लेक्स – बी१, बी२, बी३, बी६, बी१२ हे डोळ्यांचा ताण कमी करून रेटिना आणि कॉर्नियाचं रक्षण करतात. हिरव्या भाज्या, शेंगा, दूध, दही यातून मिळतात.
व्हिटॅमिन C – डोळ्यांचं फ्री रॅडिकल्सपासून संरक्षण करतं. संत्रं, स्ट्रॉबेरी, कीवी, पपई, ब्रोकली आणि टोमॅटो यामध्ये हे विपुल प्रमाणात असतं.
व्हिटॅमिन D – डोळ्यांची जळजळ, ड्रायनेस आणि मोतिबिंदू यापासून बचाव करतं. थोडा वेळ उन्हात बसणं किंवा गायीचं दूध व सोया मिल्क घेणं उपयुक्त ठरतं.
व्हिटॅमिन E – डोळ्यांवरील ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करतं. अॅवाकाडो, नट्स, हिरव्या भाज्या आणि सूर्यफुलाच्या बियांमध्ये सापडतं.
तज्ज्ञांच्या मते, योग्य आहार आणि थोडा वेळ स्क्रीनपासून दूर राहून डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अन्यथा लवकरच डोळ्यांची दृष्टी कमजोर होण्याचा धोका निर्माण होतो.