नेत्र तपासणी ॲम्बुलन्स ‘मायेची दृष्टी’ ठरणार!

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विश्वास : बाळासाहेबांच्या जयंतीदिनी ‘दृष्टीदान’चा संकल्प

0

पाळधी, ता. धरणगाव
सेवा हेच शिवसेनेचे खरे व्रत आहे. शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यसेवा पोहोचलीच पाहिजे, हेच बाळासाहेबांचे स्वप्न होते. आज या नेत्र तपासणी ॲम्बुलन्सच्या माध्यमातून गरिबांच्या दारात आरोग्य पोहोचत आहे. हीच बाळासाहेबांना खरी मानवंदना आहे. जोपर्यंत समाजातील शेवटचा माणूस सुखरूप होत नाही, तोपर्यंत ही सेवा अखंड सुरू राहणार असून लवकर शिवसृष्टी उभारण्याचा मानस पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर समाजसेवेचा संकल्प अधिक दृढ करत, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जीपीएस मित्र परिवाराच्या अत्याधुनिक नेत्र तपासणी ॲम्बुलन्सचे लोकार्पण तसेच विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण मोठ्या उत्साहात पार पडले.
पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जनतेचे विश्वासू आरोग्यदूत’ म्हणून ओळखले जाणारे जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील व विक्रम पाटील यांच्या पुढाकारातून जीपीएस ग्रुपने आतापर्यंत 33 मोफत नेत्र तपासणी शिबिरे, 29,260 रुग्णांची तपासणी, 10,940 मोतिबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत हजारो कुटुंबांच्या आयुष्यात प्रकाश पेरला आहे. उपस्थितांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आमच्यासाठी खरे अर्थाने ‘दृष्टीदाता’ आहेत, अशा भावना व्यक्त केल्या. आतापर्यंत रुग्णांना तपासणीसाठी पाळधी येथे यावे लागत होते. मात्र ग्रामीण भागातील वृद्ध व गरजू रुग्णांची गैरसोय लक्षात घेऊन आता ही अत्याधुनिक ॲम्बुलन्स थेट गावोगावी जाऊन तपासणी करणार आहे.

विकासकामांना वेग
पोखरी वराड रस्त्याचे डांबरीकरण, गावांतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, मराठी व उर्दू शाळांसाठी नव्या खोल्या बांधकाम, पाळधी खुर्द येथे संविधान भवन, ठीक ठिकाणी ब्लॉक बसविणे, अल्पसंख्याक समाजासाठी शादीखाना हॉल, एलईडी पथदिव्यांचे लोकार्पण
अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या कामांमुळे परिसराच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे

Leave A Reply

Your email address will not be published.