Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची? निकाल अंतिम टप्प्यात!
    • हे आंदोलन म्हणजे नौटंकी आहे : लक्ष्मण हाकेंचा आरोप
    • बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून
    • चक्क शिंदेसेनेच्या नगरसिवेकेवर गुन्हा दाखल
    • मनोज जरांगे पाटलांना पोलिसांची नोटीस
    • गणेशोत्सवाच्या धामधुमीत किरकोळ वादातून गोळीबार!
    • बापरे! 40 विद्यार्थ्यांची बस सुपे घाटात उलटली!
    • जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»ताज्या बातम्या»एचएसआरपी नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ
    ताज्या बातम्या

    एचएसआरपी नंबर प्लेटसाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 15, 2026No Comments154 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    1 जुलैनंतर थेट दंडाची कारवाई : परिवहन मंत्र्यांचे आदेश
    जळगाव – वाहनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य शासनाने 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता वाहनधारकांना 30 जून 2026 पर्यंत एचएसआरपी प्लेट बसवण्याची संधी उपलब्ध असणार आहे.
    यापूर्वी शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित केली होती. मात्र, राज्यभरातून अपॉइंटमेंट मिळण्यास होणारा विलंब, तांत्रिक अडचणी तसेच वाढती मागणी लक्षात घेता सरकारने वाहनधारकांना मोठा दिलासा देत मुदतवाढ जाहीर केली आहे. दरम्यान, शासनाने स्पष्ट केले आहे की 1 जुलै 2026 पासून एचएसआरपी नंबर प्लेट अनिवार्य करण्यात येणार असून, त्यानंतर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
    एचएसआरपी नंबर प्लेट ही अत्याधुनिक सुरक्षा प्रणाली मानली जाते. या प्लेटमध्ये विशेष लेझर कोड, क्रोमियम आधारित हॉट स्टॅम्पिंग आणि छेडछाड रोखणारी रचना असते. त्यामुळे वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि अचूक पद्धतीने पटवता येते. वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट्स आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाहनांचा गैरवापर रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचे सांगितले जात आहे. वाहनधारकांनी एचएसआरपी प्लेट बसवण्यासाठी परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच अपॉइंटमेंट बुक करावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. कोणत्याही अनधिकृत एजंट किंवा दलालांच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    बिबट्या दिवसाढवळ्या थेट अंगावर आला धावून

    September 16, 2026

    जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे निघाला!

    September 15, 2026

    शालेय पोषण आहाराचा टेम्पो उलटून मजुरांचा जागीच मृत्यू

    September 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif