पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा रद्द करण्यात आली. त्यामुळे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना संधी देण्यासाठी एमपीएससीने अर्ज सादर करण्यास 24 जूनपर्यंत मुदतवाढ दिली आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर एमपीएससीने पदभरती परीक्षांसाठी कमाल संधींची मर्यादा लागू करण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला होता. मात्र, काही दिवसांपूर्वी या निर्णयात फेरबदल करून प्रवर्गासाठी निश्चित केलेल्या वयोमर्यादेनुसार परीक्षा देण्याबाबतचा निर्णय लागू करण्यात आला. मात्र, राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 साठी काही उमेदवारांना अर्ज सादर करता आला नसल्याची शक्यता आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येण्याच्या दृष्टीने अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय एमपीएससीने घेतला. त्यानुसार आता उमेदवारांना 24 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून शुल्क भरता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.