उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena chief Uddhav Thackeray) मोठी कारवाई केली आहे. शिंदेगटात (Shinde Group) गेलेले शिवसेनेचे आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी (Expulsion from Shiv Sena) करण्यात आली आहे.

उदय सामंत आणि यशवंत जाधव हे शिवसेनेत उपनेते पदावर कार्यरत होते. मात्र, शिवसेना पक्षात बंडखोरी करत या दोन्ही नेत्यांनी शिवसेने प्रमुख बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे, उद्धव ठाकरेंनी या दोन्ही नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी केली. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून यासंदर्भात पत्रही जारी करण्यात आलं आहे.

आदित्य ठाकरेंच्या या विधानावरुन उदय सामंत यांनी विधानसभेत भूमिका मांडताना शिवसेना नेतृत्वाच्या भूमिकेवर भाष्य केलं. तसेच, महाविकास आघाडीत सहभागी होणे हीच खरी गद्दारी असल्याचं नाव न घेता म्हटलं. त्यामुळे, अप्रत्यक्षपणे सामंत यांनी आदित्य ठाकरेंवरच निशाणा साधला होता. त्यानंतर, काही दिवसांतच शिवसेनेनं उदय सामंत यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यामुळे, शिंदे गट विरुद्ध शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्ष आणि पक्ष संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.