Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दिल्लीतील इमारत कोसळली; किती विद्यार्थी दबले गेले?
    • यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला
    • यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?
    • भुसावळ राष्ट्रवादीचे ११ नगरसेवक शिवसेनेत; सावकारे गटात अस्वस्थता!
    • बापरे! मुख्य वीज उपकेंद्रात भीषण स्फोटाने खळबळ!
    • दिल्लीत 5 मजली इमारत कोसळली
    • महाराष्ट्रातील ‘या’ भागांमध्ये पावसाचा इशारा
    • नव्या टीमनंतर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना वेग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»मनपातील पहिल्या कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी घोषित
    जळगाव

    मनपातील पहिल्या कर्मचारी संघटनेची कार्यकारिणी घोषित

    मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा : कर्मचारी संघटनेचे स्वप्न पूर्ण
    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 24, 2026No Comments25 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    महानगरपालिका, नगरपरिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र प्रदेश (संलग्न भारतीय मजदूर संघ) यांच्या जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण, सत्कार व फलक अनावरण सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कर्मचारी हित, संघटन बळकटी आणि महानगरपालिकेच्या विकासासाठी प्रशासन व कर्मचारी यांच्यात समन्वयाने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार राजूमामा भोळे तर उद्घाटन महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समितीचे सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सिंधुताई कोल्हे, भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष प्रभाकर बाणासुरे, संघटनमंत्री बाळासाहेब भुजबळ, ज्येष्ठ कार्यकर्ते पी. जे. पाटील, जिल्हा सचिव सचिन लाडवंजारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

    कार्यक्रमात नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कर्मचारी संघटनांची जबाबदारी, प्रामाणिक सेवा, शिस्तबद्ध कामकाज आणि जनहिताला प्राधान्य देत प्रशासनाशी समन्वय राखून काम करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी शाखाध्यक्ष गौरव सपकाळे, कार्याध्यक्ष समीर बोरोले, सचिव गौरव पुराणिक, उपाध्यक्ष अतुल पाटील, सहसचिव महेश ठाकूर, मुख्य सल्लागार योगेश बोरोले, सल्लागार योगेश वाणी, कोषाध्यक्ष शुभम कोतकर, प्रसिद्धी प्रमुख आकाश जगताप, संघटक संजय ठाकूर, चंद्रशेखर तायडे यांच्यासह कार्यकारिणी सदस्य, महानगरपालिका कर्मचारी आणि भारतीय मजदूर संघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन जळगाव शहर महानगरपालिका शाखेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    यावल–रावेर बसमधून सोन्याच्या दोन वाट्या चोरीला

    September 7, 2026

    यावल तालुक्यात अवैध धंद्यांचा महापूर; प्रशासन गप्प का?

    September 7, 2026

    युवतींच्या दहीहंडीत शिवतीर्थावर नारीशक्तीचा थरार

    September 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif